बार्शी – शहरातील मंगळवार पेठ येथील श्री येडेश्वरी देवी भक्त मंडळाच्यावतीने श्रीक्षेत्र येरमाळा येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री येडेश्वरी देवी यात्रेत भाविक भक्तांसाठी मोफत दालचा मसाला भात व बुंदीचा लाडू महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आला.
मंडळाचे हे सातवे वर्ष असून मंडळ प्रत्येक वर्षी मोफत महाप्रसादाचा उपक्रम राबवत असते. समाजातील दानशूर व्यक्तीच्या पुढाकारातून तसेच मंडळातील सदस्य यांच्या वर्गणीच्या माध्यमातून हा महाप्रसादाचा उपक्रम अखंडपणे चालू आहे.
श्रीक्षेत्र येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या हजारों भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या उपक्रमाचे श्री येडेश्वरी देवी भाविक भक्तांनी मंगळवार पेठ श्री येडेश्वरी देवी भक्त मंडळाचे आभार मानत कौतुक केले.
या मोफत महाप्रसाद वाटपप्रसंगी मंगळवार पेठ श्री येडेश्वरी देवी भक्त मंडळाचे सर्व कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























