Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिव्यांग प्रवाशाचा अपमान करणाऱ्या ‘त्या’ वाहकाची चौकशी करा; विभागीय नियंत्रकांचे पंढरपूर आगार व्यवस्थापकांना तात्काळ आदेश! 

तरुण भारतbyतरुण भारत
June 4, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – एसटी बसमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव असलेल्या जागेचीमागणी केली असता जागा देण्यास नकार देत दिव्यांगाचा अपमान करणाऱ्या मुजोरवाहकाविरुद्ध आणि फोन बंद ठेवून बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या आगार व्यवस्थापका विरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागीय नियंत्रकांनी पंढरपूर आगार व्यवस्थापकांना याप्रकरणी तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे कडक आदेश जारी केले आहेत.
काटेवाडी (ता.मोहोळ) येथील सामाजिक कार्यकर्ते वैजिनाथ औदुंबर धेडे यांनी दि. २५ मे२०२६ रोजी पंढरपूर आगाराच्या बस क्रमांक (एम एच १४ बीटी ३३७५) मधून प्रवास करत असताना, एका दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव असलेल्या आसनाची मागणी बसच्या वाहकाकडे केली होती. मात्र, संबंधित वाहकाने जागा उपलब्ध करून देण्यास तर नकार दिलाच, उलट दिव्यांगाबद्दल अनुद्गार काढून त्यांचा जाहीर अपमान केला. या गंभीर प्रकाराबाबत धेडे यांनी तात्काळ पंढरपूर आगार व्यवस्थापक आणि (एडब्ल्युएस) यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचाफोन बंद होता व त्यांनी कॉल स्वीकारला नाही. त्यामुळे संबंधित प्रवाशाला कामती तेसोलापूर असा संपूर्ण प्रवास उभे राहून, प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहनकरत करावा लागला.
या संतापजनक प्रकाराबाबत वैजिनाथ धेडेयांनी सोलापूर विभागीय कार्यालया कडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचीदखल घेत विभागीय नियंत्रकांनी धेडे यांना अधिकृत पत्र पाठवून झालेल्या त्रासाबद्दल रा.प.महामंडळातर्फे अधिकृतपणे दिलगिरी (माफी) व्यक्त केली आहे. तसेच संबंधित वाहक आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश पंढरपूर आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.
वैजिनाथ धेडे यांचा इशारा या संपूर्ण प्रकरणावर बोलताना सामाजिक कार्यकर्ते वैजिनाथ धेडे यांनी आगार व्यवस्थापक, पंढरपूर यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, “या प्रकरणात मला तात्काळ पूर्ण न्याय मिळाला पाहिजे. जर प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर हा लढा येथेच थांबणार नाही. याविरुद्ध थेट परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) , मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्याकडे दाद मागण्यात येईल. तसेच विभागीय नियंत्रक (डीसी) दालनात तीव्र आंदोलन, उपोषण करण्यात येईल आणि दोषींना थेट कोर्टात खेचले जाईल.”यांची दक्षता घ्या.
या संपुर्ण प्रकरणा संदर्भात माहि
तीजाणून घेण्यासाठी किंवा वाहक आणि आगार व्यवस्थापक यांची बाजू जाणून घेण्यासाठी पंढरपूरआगार व्यवस्थापक योगेश लिंगायत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,या बाबतचा अहवाल आपण गुरुवारी वरिष्ठांकडे सादर करणार आहोत. दरम्यान त्या दिवशी संबंधितएसटीबस मध्ये एकुण चार दिव्यांग प्रवासी प्रवास करीत होते. त्यामुळे तीन दिव्यांग प्रवाशांनाबसच्या वाहकाने अगोदरच जागा उपलब्ध करुन दिलेली होती. बस मधील इतर प्रवाशांची तिकीटकाढण्याचे काम करुन तो पाठीमागून पुढे येवून संबंधित चौथ्या दिव्यांग प्रवाशाला देखीलत्यांनी पुढे जागा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती आपणाला संबंधीत बसच्या वाहकानेदिल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी सांगितली. दरम्यान आपल्या बंद असलेल्या भ्रमणध्वनीसं
दर्भात आगार व्यवस्थापकाने सांगितले की, आपला भ्रमणध्वनी रात्रंदिवस प्रवाशांच्यासोयीसाठी किंवा प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी सुरु असतो. त्यामुळे संबंधित तक्रारदारांनीफोन केला तेव्हा त्यावेळी आपल्या भ्रमणध्वनी मध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली असेल.बऱ्याच वेळा अशा तांत्रिक अडचणीमुळे भ्रमणध्वनी लागत नाही त्याला आपण कोणीच काही करुशकत नाही. त्यामुळे तो काही आपण मुद्दाम बंद करुन ठेवला असा तर्क काढणे चुकीचे आहेअसे देखील आगारप्रमुख योगेश लिंगायत यांनी दैनिक सोलापूर तरुणभारतशी बोलताना सांगितले.
Post Views: 26
Previous Post

समायोजनाची काटेकोर अंमलबजावणी करा अन्यथा वेतन रोखणार ?

Next Post

रेशन धान्य घोटाळा दडपण्याचा प्रयत्न? मंगळवेढा पुरवठा विभागाच्या कारवाईवर संशयाचे सावट,पंचनामा झाला, धान्य कमी आढळले…

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रेशन धान्य घोटाळा दडपण्याचा प्रयत्न? मंगळवेढा पुरवठा विभागाच्या कारवाईवर संशयाचे सावट,पंचनामा झाला, धान्य कमी आढळले...

ताज्या बातम्या

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १४ जूनला ऑनलाईन योग सत्र

June 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

June 13, 2026
जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

 जिल्हा परिषदेत ९९ केंद्रप्रमुखांचे समायोजन शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

June 13, 2026
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

June 13, 2026
पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907396

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697