सोलापूर : गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळ, विष्णू महेश चौक (प्रगती चौक), विडी घरकुल यांच्या वतीने यंदा मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्रींची पूजा व प्रतिष्ठापना प्रभाग क्रमांक १०च्या नगरसेविका उज्वला अविनाश दासरी आणि मंडळाच्या भाग्यलक्ष्मी जगपती मिठ्ठा यांच्यासह गोविंदराज नगरमधील महिला भगिनीच्या प्रमुख उपस्थितीत श्री ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
दरम्यान, बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या मोदकांचा लिलाव घेण्यात आला. १०१ रुपयांपासून सुरू झालेली बोली थेट २१२१ रुपयांपर्यंत पोहोचली. अखेर दिनेश दुडम परिवाराने २१२१ रुपयांना मोदक घेतला. मंडळाचे अध्यक्ष जगपती मिठ्ठा यांनी दिनेश दुडम परिवाराचा पुष्पगुच्छ व प्रसाद देऊन सत्कार केला. या लिलाव प्रक्रियेत परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या लिलावाचे सूत्रसंचालन व्यंकटेश दोंता यांनी केले.
तत्पूर्वी लालबागच्या राजा गणपतीची ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. भक्तगण बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन उत्साहात सहभागी झाले होते.
यावेळी मंडळाचे सचिव अनिल गोसकी, उपाध्यक्ष दिनेश दुडम, खजिनदार अमर कोलप्याक, तसेच श्रीशैल बंदगी, उमेश कामुर्ती, शंकर श्रीकोंडा, किरण रच्चा, चक्रधर अन्नलदास आदी उपस्थित होते.



















