Tuesday, October 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अमेरिकेतही बदलाचे वारे, निवडणूकीतून बायडेन यांची माघार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 22, 2024
in world
0
अमेरिकेतही बदलाचे वारे, निवडणूकीतून बायडेन यांची माघार
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

* भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा

वॉशिंग्टन,२२ जुलै (हिं.स.) : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतली आहे. तसेच, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्र लिहून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच विद्यमान उपाध्यक्ष तथा भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना आपला पाठिंबा घोषित केला आहे.

अमेरिकचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील लाईव्ह डिबेटमध्ये बायडेन निष्प्रभ ठरल्यापासूनच, जाणकारांना अंदाज होता की बायडेन निवडणूक रिंगणातून माघार घेतील. डिबेटमध्ये ट्रम्प यांच्या प्रभावी प्रदर्शनामुळे बायडेनच्या माघारीची चर्चा वाढली होती. या राजकीय वातावरणात ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, ज्यामुळे त्यांच्या प्रति सहानुभूतीची लाट निर्माण झाली. या घटनेने ट्रम्प यांना अधिक समर्थन मिळाल्याने, त्यांची विजयाची शक्यता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

८१ वर्षीय बायडेन यांच्या मानसिक आरोग्याबाबतही त्यांच्या रिपब्लिकन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते, ज्यामुळे त्यांच्या क्षमतांवर शंका निर्माण झाली. या सर्व पार्श्वभूमीवर, बायडेन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा ‘एक्स’वर केली आहे. दरम्यान बायडेन यांनी आपला पाठींबा भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना दिल्याचे जाहीर केले. कमला हॅरिस या उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला आहेत आणि त्यांची उमेदवारी आता अधिकृत झाल्यामुळे आगामी निवडणुकीत ट्रम्प यांच्याशी त्यांची थेट लढत होईल.

बायडेन यांच्या माघारीने अमेरिकन राजकारणात मोठा बदल घडवला आहे. त्यांच्या निर्णयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या रणनीतीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

काल (रविवार) रात्री उशीरा जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. अमेरिका आणि माझा पक्ष यांच्या हिताच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला आहे, असे बायडेन यांनी यांनी सांगितले. खरे तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या डिबेटदरम्यानही बायडेन यांना त्यांची भूमिका ठोसपणे मांडता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी बायडेन यांना करोना संसर्ग झाला होता. या संसर्गामुळे श्वसनाचा त्रासही सुरू झाला होता. गेल्या काही महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विस्मरण झाल्याचेही दिसले होते.

जो बायडेन यांनी त्यांचा निर्णय जाहीर करताच डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली, ते चांगलेच झाले. खरे तर ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष होते. ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी योग्य व्यक्ती नव्हते. मागच्या निवडणुकीत खोटे बोलून आणि खोटा प्रचार करून ते राष्ट्राध्यक्ष झाले, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी कमला हॅरिस यांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केले. जर डेमोक्रॅट्स पक्षाने कमला हॅरिस यांना उमेदवारी दिली, तर बायडेन यांच्या तुलनेत कमला हॅरिस यांचा पराभव करणे सोपेे आहे, असे ते म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाचा विजय नक्कीच विजय होईल, असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला.

Post Views: 72
Previous Post

बांगलादेशात आरक्षण ५६% वरून ७% वर, तरीही हिंसाचाराची धग कायम !

Next Post

गजापुर प्रकरणी मुदखेड कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन*

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गजापुर प्रकरणी मुदखेड कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन*

गजापुर प्रकरणी मुदखेड कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन*

ताज्या बातम्या

बोरोटी (खुर्द) येथे महर्षी वाल्मिकी जयंती 

October 27, 2026

बोरोटी कन्नड शाळेचे शिक्षक शरणप्पा फुलारी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 27, 2026
दुष्काळ : प्रत्येक कुटुंबाने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक

दुष्काळ : प्रत्येक कुटुंबाने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक

October 27, 2026

चार एकर ऊस जळाले विद्युत वितरण कंपनी लक्ष देणार का ?

October 27, 2026

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतनची उत्तुंग भरारी! आशुतोष बाबरची राज्यात द्वितीय क्रमांकाची कामगिरी

October 27, 2026
बँक ऑफ महाराष्ट्र, टेंभुर्णी शाखेतर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत ₹२ लाखांचा विमा क्लेम प्रदान

बँक ऑफ महाराष्ट्र, टेंभुर्णी शाखेतर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत ₹२ लाखांचा विमा क्लेम प्रदान

October 27, 2026
अकलूज येथे वीरशैव लिंगायत महिला गरबा-दांडिया स्पर्धा उत्साहात संपन्न

अकलूज येथे वीरशैव लिंगायत महिला गरबा-दांडिया स्पर्धा उत्साहात संपन्न

October 27, 2026
पोलीस तणाव मुक्ती अभियान:आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद योग शिबिराचे आयोजन

पोलीस तणाव मुक्ती अभियान:आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद योग शिबिराचे आयोजन

October 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1425150

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!