पंढरपूर – कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील विद्यार्थिनी सरस्वती कौलगे हिची आंतर विद्यापीठ (राष्ट्रीय ) खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा मध्य प्रदेश राज्यातील रेवा येथे आयोजित करण्यात येणार असून, तिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सरस्वती कौलगे हिने आपल्या सातत्यपूर्ण सराव, चिकाटी व उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही निवड मिळवली असून, तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयातर्फे तिचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. बी.टी.जाधव यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागाचे उपप्राचार्य सर्व विभाग प्रमुख व जिमखाना विभागातील प्रा. विठ्ठल फुले, प्रा.मनोज खपाले,प्रा. अनिल परमार, तसेच जिमखाना कमिटी सदस्य डॉ. भारती सुडके उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने सरस्वती कौलगे हिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत असून, आगामी स्पर्धेत ती उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
















