सोलापूर : अधिकमासाच्या पर्वकाळात दमाणी नगरातील गडदर्शन समाज मंदिरात बुधवार १० जूनपासून ह.भ.प.माऊली महाराज बचुटे मित्रपरिवाराच्यावतीने ” पंचदिनी भव्य किर्तन महोत्सव ” आयोजित करण्यात आला आहे. पाच दिवस चालणाऱ्या या किर्तन महोत्सवात संत परंपरेतील व फड परंपरेचे वंशज किर्तनासाठी वक्ते म्हणून लाभले आहेत.
रोज सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी ९,१२,१८ वा अध्याय पारायण , सायंकाळी – ५.३० ते ६.३० या वेळेत हरिपाठ , रात्री ८ ते १० या वेळेत किर्तन व महाप्रसाद होणार असल्याची माहिती,किर्तन महोत्सवाचे आयोजक ह.भ.प.माऊली महाराज बचुटे-सवाळकर यांनी दिली.
बुधवार १० जून रोजी रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प.भागवत महाराज शिरवळकर ( वैराग्यसंपन्न गंगूकाका शिरवळकर यांचे वंशज तथा राष्ट्रीय अध्यक्ष – वारकरी पाईक संघ ) यांचे किर्तन होणार आहे.
दुसऱ्या दिवशी गुरूवार ११ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.माधव महाराज नामदास (श्री संत नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज) यांचे किर्तन होईल . तर त्याच दिवशी म्हणजे गुरुवारी रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर (अध्यक्ष – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती,पंढरपूर तथा श्री नाथ संस्थान,औसा) यांचे किर्तन होणार आहे.
तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार १२ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.हरी महाराज राशिनकर (श्री गुरूजीबुवा राशिनकर फड परंपरेचे वंशज) यांच्या किर्तनाचा लाभ घेता येणार आहे.याच दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते १० या वेळेत .ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी (श्री संत एकनाथ महाराजांचे विद्यमान वंशज) यांचे किर्तन होणार आहे.
चौथ्या दिवशी शनिवार १३ जून रोजी रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प.पांडुरंगबाबा महाराज घुले ( अध्यक्ष – श्री गाथा मंदिर अध्यक्ष ,देहु ) यांचे किर्तन होणार आहे. पाचव्या दिवशी रविवार १४ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.कान्होबा महाराज देहुकर ( श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज ,पंढरपूर ) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.पाच दिवस चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन ह.भ.प.माऊली महाराज बचुटे-सवाळकर मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
Post Views: 6