सांगोला – फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व व्यावसायिक ज्ञानवृद्धीसाठी औषधनिर्माण क्षेत्रातील एचपीएलसीचे अनुप्रयोग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते सीएमआर कॉलेज ऑफ फार्मसी, कांडलकोया, जि.मेदचल, तेलंगणा येथील प्रा.डॉ.बनोथू भद्रू यांनी औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी एचपीएलसीचा कशाप्रकारे वापर केला जातो याची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अनेक प्रश्न विचारले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.संजय बैस यांनी अशा तज्ज्ञ व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच उद्योग क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींची माहिती मिळते आणि त्यांच्यामध्ये संशोधनाची आवड निर्माण होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी अशा उपक्रमांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.नाहीद शेख, डॉ.योगेश राऊत, सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 19