सोलापूर – किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठेंगे वस्ती, वांगी येथे घडली आहे. या प्रकरणी एका संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरिफा महमद कोरबू (वय ३५ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, ठेंगे वस्ती येथे ही घटना घडली. फिर्यादी व राजेभाई फकीर यांना आरोपी महादेव ठेंगे याने त्यांच्यातील जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर रागाच्या भरात जीव घेण्याच्या उद्देशाने गंभीर हल्ला केला.
घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी , पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व डी. बी. पथकाने तपास सुरू केला.
महादेव ठेंगे हा सदरचा गुन्हा करून पळून गेला होता . त्याचे बाबत गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती काढून आरोपीला मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथे अटक करण्यात आली. पोलीस उप निरीक्षक राज डांगे तपास करीत आहेत.
Post Views: 22