Thursday, December 11, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कार्तिक अमावास्यानिमित्त हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान हजरत शेख नुरुद्दीन बाबा दर्गाह समोर दिव्यांच्या रोषणाई

तरुण भारतbyतरुण भारत
November 22, 2025
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – कार्तिक अमावास्याच्या मंगल पर्वावर  शहरातील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठासह श्री  श्री नवसाचा मारुती मंदिर व हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शेख नुरुद्दीन बाबा दर्गाह समोर हजारो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले. श्री शांतलिंगेश्वर हिरेमठाचे शिष्य व भक्तगण यांच्या सहकार्याने आणि शहरवासीयांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी मठाधिपती श्री. ष . ब्. जय गुरू शांत लिंगराध्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हिरेमठातील श्री रेणुकाचार्य मूर्ती, माजी मठाधिपती लिंगैक्य श्री गुरुशांतलिंग महास्वामीजी व काशी विद्यापीठाचे माजी वरिष्ठ प्राध्यापक लिंगैक्य डॉ. श्री ष. ब्र. श्रीपती पंडिताराध्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आकर्षक फुलांची सजावट आणि सुंदर रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. पौरोहित वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी केले. तर महामंगलारती आझाद गल्ली महिला मंडळांनी केले.

या कार्यक्रमाला अडत व्यापारी चंद्रकांत स्वामी, भीमाशंकर करकी, कुंभार समाजाचे अध्यक्ष भीमाशंकर कुंभार, बाबुराव बिराजदार, इरण्णा पाटील, मठाचे व्यवस्थापक कल्लप्पा सोमेश्वर, शरणप्पा कुंभार, अशोक पाटील, शिवप्पा कुंभार, कुंभार समाज महिला मंडळ आदीसह शहरातील शेकडो भाविक उपस्थित होते. कुंभार गल्ली तरुण मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन केले.

हिंदू व मुस्लिम समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शेख नुरुद्दीन बाबा दर्गाह समोर यावेळी पहिल्यांदाच कार्तिक अमावस्या निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याने परिसरातील भाविकांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, आकर्षक रांगोळी रेखाटून विविध सामाजिक संदेश रेखाटण्यात आले होते. दर्गाह परिसर कट्ट्यावर ठिकठिकाणी भक्तांच्या भाविकतेने उजळलेला दीपोत्सव पाहून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.

दर्गाह च्या गाभारा पासून परिसरातील प्रत्येक कोपऱ्याला दिव्यांची आरास सजवण्यात आली होती. विशेष म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर शहर व ग्रामीण भागातील भाविकांनी दर्गाहवर दिवे लावत परिसर उजळवला. शेकडो दिव्यांचे प्रतिबिंब फरशीवर पडून एक अद्भुत, नयनरम्य दृश्य तयार झाले. या दर्गाह स्थळी फुलांचा सजावट, दर्शन, नामस्मरण, आरती आणि गजरांनी वातावरण भारावून गेले होते. शेकडो दीपांच्या झगमगाटात दर्गाह च्या पार्श्वभूमीवर दर्गाह मध्ये सहभागी भाविकांनी बाबांचा  जयघोष करत कार्तिक अमावस्या उत्सव साजरा केला.अध्यात्मिक तेजया निमित्ताने दर्गाह सेवा समितीच्या वतीने विशेष पूजन, आरती, तसेच सत्संगाचे आयोजन करण्यात आले. दर्गाह व परिसरात दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात सजलेल्या आरासीत दर्गाहचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या या दर्गाह वरील हा दीपोत्सव म्हणजे भक्तिभाव आणि अध्यात्म यांचा संगमच ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे संस्थापक महंमदपाशा पिरजादे, कार्याध्यक्ष कमलाकांत होटकर, विरुपाक्ष कुंभार, सादिक बागवान, राजशेकर कापसे, नंदकुमार जगदाळे, स्वामीराव वाकडे, संजय झिपरे, भगत भोसले,महादेव कांबळे, गुरुनाथ मोकाशी,बसवराज धनोरे,लक्ष्मीकांत कोळी,आकाश मुसळे,आपाशा मलवे आदींनी परिश्रम घेतले. 

श्री नवसाचा मारुती मंदिरातसुद्धा कार्तिक अमावसा निमित्त दीपोत्सवाने उजळून निघाला होता. सदरचा मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, श्री वटवृक्ष स्वामी देवस्थान लगत असल्याने जागृत मारुती मंदिर आहे. म्हणून याचे आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे देवस्थानचे पौराहीत्य करणारे गणेश गुमास्ते आहेत. या मंदिरात कार्तिक अमावसा साजरी करण्याचे परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे.

याठिकाणी शहरवासीयांसोबत परगावचे स्वामीभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी उंच आकाशात फाट्याक्याची आताषबाजी करण्यात आले. शेवटी तिन्ही ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आले. 

दिपोत्सवाचे महत्त्व प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. हा अंधार दूर करून जीवनात सकारात्मकता, आनंद आणि समृद्धी आणतो. हे सण मानवी नातेसंबंध दृढ करण्यास मदत करते आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करते. मनातील अज्ञान आणि अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणणे हा दीपोत्सवामागील मुख्य हेतू आहे.जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

– श्री. जयगुरूशांतलिंगराध्य महास्वामीजी

Post Views: 25
Previous Post

नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात

Next Post

बार्शी ते कोल्हापूर हायकोर्ट बससेवा उद्यापासून शुभारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शी ते कोल्हापूर हायकोर्ट बससेवा उद्यापासून शुभारंभ

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये कफ सिरपवर मोठी कारवाई! 500 बाटल्या जप्त

December 10, 2025

रात्रीचा पाणीपुरवठा बंद? नागपूर अधिवेशनात मोठा निर्णय

December 10, 2025

ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कळंब तहसीलदारांना निवेदन!

December 10, 2025

कळंब तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

December 10, 2025

लोकमंगल परिवाराचा स्नेहसंवाद मेळावा उत्साहात संपन्न

December 10, 2025

यंत्रमागधारकांनी अत्याधुनिक डाईंग पद्धतीचा अवलंब करावा

December 10, 2025

जिल्ह्य परिषद शाळेत ताबडतोब शिक्षक नेमण्याची मागणी

December 10, 2025

हमी भावाने माल खरेदीची आँनलाईन नोंदीची अट शिथील करावी – चेअरमन तुकाराम ढवळे

December 10, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

चन्नवीर चिट्टें सारख्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी – जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुनशिवाचार्य

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उत्तम कामे होत असून मोदीसाहेबांचे नेतृत्व चन्नवीर चिट्टे सारख्या देशभरातील कोट्यावधी प्रामाणिक...

मवीआ चा महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवू – माजी मंत्री चंद्रकांत खैरे

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महाविकास आघाडीचा महापौर सोलापूर महानगरपालिकेत बसवण्याचे लक्ष्य ठेवून आम्ही लढणार आहोत. आगामी निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे....

वकिलाच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट; उमेदवारी देण्याची मागणी

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग...

उप सभापती अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या प्रश्नांचा निपटारा 

byतरुण भारत
December 6, 2025
0

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक संदर्भात...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0556460

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697