सोलापूर – डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या सर्व १२ वर्षांखालील ‘लिटिल चॅम्प’ खेळाडूंना व पालकांना कळविण्यात येते की, स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार २६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे.

या सोहळ्यात सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र व सामनावीर बक्षीस देण्यात येईल. जे खेळाडू फोटो सेशनला येऊ शकले नव्हते, त्यांनी सोबत पासपोर्ट साईज फोटो आणावा; जेणेकरून तो प्रमाणपत्रावर लावून असोसिएशनचा शिक्का मारून दिला जाईल. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व पालक व खेळाडूंसाठी अल्पोपहाराची सोय केली आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास न चुकता उपस्थित राहावे. पाऊस आल्यास कार्यक्रम स्टेडियमच्या हॉलमध्ये घेतला जाईल, असे जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबर्सो यांनी कळविले आहे.















