
यावेळी शंकरराव कदम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सद्गुरू कदम, कु.पायल साठे आदि उपस्थित होते.
विक्रम कदम यांचे शिक्षण बी.ए., मास कम्युनिकेशन ऍण्ड जर्नालिझम पत्रकारिता पदवीचे झालेले असून त्यांनी पंढरपूर येथे अगदी लहान वयातच पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकले ते गेल्या 12 ते 13 वर्षांपासून पत्रकार म्हणून काम करीत आहेत. विविध वृत्तपत्र, युट्यूब चॅनलच्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांवर आवाज उठवून त्यांना प्रकाशझोतात आणून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. त्यांचे छोटे बंधू विशाल कदम हे पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कार्य पाहून पत्रकारिता करीत असतानाच कायद्याचे शिक्षण घ्यावे त्यातून गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी त्यांनी तीन वर्षे विविध विषयांचा अभ्यास करून एलएलबी परिक्षा उत्तीर्ण होवून वकील पदवी मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदन केलेले आहे.























