सदाशिवनगर – अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना मांडवे हद्दीत दुपारी १२ च्या सुमारास घडली. विठ्ठल विष्णू माने ( वय ७१ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की तिरवंडी ता.माळशिरस येथील विठ्ठल माने हे आपल्या दुचाकी वाहना वरून लग्नासाठी चालले असता मांडवे हद्दीत अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकला धडक दिली यामध्ये ते जागीच ठार झाले.



























