पंढरपूर – पंढरपूर शहर आणि तालुक्यातील व्यापाऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी राजेंद्र फडे, तर व्हाईस चेअरमनपदी आदित्य फत्तेपुरकर यांची निवड करण्यात्त आली. निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक अधिकारी सुनील तेमनकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
मर्चट बँकेच्या संचालक मंडळाची सभा कै. बाबुराव म्हामाने सभागृहात झाली. यावेळी माजी चेअरमन नागेश भोसले, सोमनाथ डोंबे, अमजीत पाटील, राजू मोरे, बँकेचे कार्यकारी अधिकारी अतुल म्हमाणे, व्यवस्थापक रमेश कुलकर्णी यांच्यासह संचालक उपस्थित होते.
सध्या मर्चेंट बँकेची आर्थिक घोडदौड चांगल्या पद्धतीने सुरू असून, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यां कडून बँकेच्या पुढील वाटचालीबाबत व्यापारी आणि सभासदांमध्ये उत्सुकता आहे.





















