Saturday, May 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नीट पेपरफुटीचं माढा कनेक्शन,

"माझी पत्नी मनोरुग्ण.."; आरोपी शिक्षकानं करुन घेतली बदली, पोटशिक्षकाची नेमणूक करुन लातुरात घ्यायचा क्लास!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 25, 2024
in crime
0
नीट पेपरफुटीचं माढा कनेक्शन,
0
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नीट प्रकरणातील आरोपी शिक्षक संजय जाधवनं पोलिसांच्या चौकशीनंतर पोबारा केला होता. आता अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशभरात गदारोळ माजवणाऱ्या नीट पेपरफुटीचं (NEET Paper Leak Case) लातूर कनेक्शन (Latur News) आता थेट माढापर्यंत (Madha) पोहोचलं आहे. या प्रकरणात दोन्ही शिक्षकांना दहशतवाद‌विरोधी पथकाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी संजय जाधव (Sanjay Jadhav) हा सोलापुरातील (Solapur News) माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता. जिल्ह्यातील शाळेत असणाऱ्या उपशिक्षकाचं नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्यानं माढा तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली आहे.

नीट (NEET) प्रकरणातील आरोपी शिक्षकानं पोलिसांच्या चौकशीनंतर पोबारा केला होता. आता अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या संजय जाधवबाबत शिक्षण विभागात अधिकृतरीत्या कोणताही अहवाल पोलिसांकडून देण्यात आलेला नाही.

लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक संजय तुकाराम जाधव आणि त्याचा मित्र उपशिक्षक जलीलखा उमरखान पठाण हे दोघेजण पैसे घेऊन नीट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती एटीएस पथकाला समजल्यानंतर शनिवारी ते लातूरमध्ये दाखल झाले आणि संबंधित दोघांची पडताळणी आणि चौकशी केली आणि त्यांच्यासह इतरांवर रविवारी रात्री उशिरानं गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी दोघांनाही अटक करण्यात आली.

संजय जाधव माढ्यातील प्राथमिक शाळेत उपशिक्षक

संशयित आरोपी उपशिक्षक संजय जाधव 26 जून 2023 पासून माढा तालुक्यातील टाकळी प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याअगोदर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली देऊळ जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून 10 सप्टेंबर 2003 रोजी शाळेत हजर होऊन नियुक्त झाला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सावंतवाडी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मडुरे नंबर 3 शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत होता आणि तेथून तो 2 मे 2023 रोजी कार्यमुक्त होऊन टाकळी येथे रुजू झाला होता. तो आजपर्यंत येथीलच शाळेवर कार्यरत आहे.

“माझी पत्नी मनोरुग्ण…”, असं सांगून संजय जाधवनं अक्कलकोटला बदली करुन घेतली

नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या बदलीमध्ये त्यानं आपली पत्नी मनोरुग्ण असल्याचं दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र, अद्याप संजय जाधवला टाकळी येथून कार्यमुक्त करण्यात आलेलं नाही. पण 15 जूनला शाळा सुरू झाल्यापासून तो जिल्हा परिषदेच्या शाळेत फिरकला नसल्याचं त्याच्या गैरहजेरीवरुन स्पष्ट झालं आहे.

शाळेवर पोटशिक्षक म्हणून नियुक्ती पण तो घ्यायचा लातूरमध्ये क्लासेस

नीट परीक्षा घोटाळ्यातील संशयित शिक्षक संजय जाधवानं दहा हजार रुपये देऊन पोटशिक्षकाची नेमणूक केली होती. आणि स्वतः लातूरमध्ये क्लास घेत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. तसेच, एवढंच नव्हे तर अक्कलकोट तालुक्यात बदलीसाठी पत्नीलाही जाधव यांनी मनोरुग्ण दाखवलं असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. याबाबत त्या शिक्षकाची चौकशीच्या मागणीचं निवेदनही जगताप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे.

Post Views: 37
Previous Post

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा – मुख्यमंत्री

Next Post

सरपंचाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सरपंचाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सरपंचाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

ताज्या बातम्या

कुस्ती नव्हे लग्नात बुटावरून हाणामारी #viral #news

May 9, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचार २० वर्षांची दिली शिक्षा #solapurnews #viral

May 9, 2026

ट्रिपल मर्डरमधील पप्पूला पोलिसांनी केले जेरबंद #solapurnews #marathinews #viral

May 9, 2026

मनपाच्या अतिक्रमण विभागाची लक्ष्मी मंडईत धडक मोहीम #solapurnews #viral #marathinews

May 9, 2026

सोलापुरात पकडला आणखी एक भोंदूबाबा #solapurnews #marathinews #viral

May 9, 2026

एम्प्लॉयमेंट चौकात ट्रान्सफॉर्मरला रात्री अचानक लागली आग #solapurnews #viral

May 9, 2026

बंगालमध्ये घुमला मुख्यमंत्री शुभेन्दू अधिकारी यांचा शपथविधीचा शब्द #viral #news

May 9, 2026

वन विभागाचा अतिक्रमणधारकांना दणका #marathinews #solapurnews #aajsolapur

May 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0855177

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697