Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान नाही?

तरुण भारतbyतरुण भारत
April 28, 2026
in editor
0
सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान नाही?
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळामध्ये (Board of Sports) विविध क्रीडा क्षेत्रातील विश्वसनियता सिद्ध केलेले, कुलगुरूंनी नामनिर्देशित केलेले तीन व्यावसायिक प्रतिनिधी नियुक्त करताना नियमाचा चुकीचा अर्थ काढत तत्कालीन व विद्यमान कुलगुरूंनी या मंडळावर शारीरिक शिक्षण संचालकाची नियुक्ती केल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा तयार करताना क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळामध्ये (Board of Sports) सर्व समावेशक क्रीडा क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचा समावेश असावा, याचा विचार हा कायदा तयार करणाऱ्या समितीने केला होता. जेणेकरून विद्यापीठाच्या क्रीडा विकासास गती मिळेल. 

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील 

57 2 (c) three professionals, nominated by the Vice-Chancellor with established

credibility in different fields of sports; या तरतुदीनुसार क्रीडा क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक व्यक्तीच्या नियुक्ती कराव्यात, असे अपेक्षित आहे. परंतु सोलापूर विद्यापीठाने या नियमाचा चुकीचा अर्थ काढत तत्कालीन कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी या अगोदर २ शारीरिक शिक्षण संचालकाची आणि नंतर विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनीही नुकतेच नियुक्त केलेले एक, हे तिन्हीही व्यक्ती शारीरिक शिक्षण संचालकच आहेत. 

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील 57 2 (f) two sports teachers, from affiliated, conducted or autonomous colleges,

nominated by the Management Council; नुसार महाविद्यालयातील दोन क्रीडा अध्यापक या मंडळावर आहेत. हे या मंडळावर असताना कुलगुरूंनी परत शारीरिक शिक्षण संचालकाची नियुक्ती केली आहे. सद्यस्थितीत या मंडळावर  57 2  (c) नुसार एकही व्यावसायिक क्रीडा तज्ञ व्यक्ती नियुक्त नाही. त्यामुळे क्रीडा अध्यापक वगळता क्रीडा क्षेत्रातील सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक क्रीडा तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यापासून  विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ वंचित राहिले आहे.

——-

क्रीडा मंडळावर विविध व्यावसायिक तज्ञांची गरज 

याबाबत सिनेट सदस्य अजितकुमार संगवे यांनी ४ मार्च २०२६ च्या पत्राने कुलगुरूंचे लक्ष वेधले होते. तसेच मीही हा मुद्दा व्यवस्थापन परिषदेमध्ये उपस्थित केला होता. परंतु नियमाचा वेगळा अर्थ काढत कुलगुरूनी शारीरिक शिक्षण संचालक हे क्रीडा तज्ञच आहेत, असे म्हटले आहे.  2019 पूर्वी 32 लाख रुपये वार्षिक अंदाजपत्रक असलेल्या क्रीडा विभागात मागील तीन वर्षापासून एक कोटीपेक्षा अधिक तरतूद खेळाडू व क्रीडा विकासासाठी केली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या गुणवंत खेळाडूंवर लक्ष ठेवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराचे मार्गदर्शक बोलावून प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे तसेच मार्गदर्शकांसाठी मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करणे अपेक्षित होते. असे झाले असते तर राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचे गुणांकन वाढलेले दिसून आले असते. यासाठी  क्रीडा क्षेत्रातील विविध व्यावसायिक तज्ञ या मंडळावर असणे गरजेचे आहे. त्याबाबत मी कुलगुरूकडे पाठपुरावा करीत आहे.

– प्रा. सचिन गायकवाड, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य 

——–

पुणे विद्यापीठात व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान

महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठाच्या कुलगुरूंनी 57 2 (c) नुसार शारीरिक शिक्षण संचालकाची नियुक्ती न करता शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू, क्रीडा संघटक आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या मंडळावर स्थान दिले आहे. राज्यातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अव्वल असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या मंडळावर  मनोज एरंडे (जलतरण), निर्मल थोरात (खो खो, दोघे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त) आणि  गायत्री मडकेकर (आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू) या तीन व्यावसायिक क्रीडा तज्ञांना स्थान दिले आहे.

Post Views: 98
Previous Post

सोलापुरात ५ मे पासून रंगणार ‘विजय चषक’ क्रिकेट स्पर्धा

Next Post

शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार

शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणार

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915226

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697