बार्शी – दि. १९ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये संतांचा पालखी सोहळा व आषाढी वारी बंदोबस्त पार पडत आहे. या यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत दिंड्यांसह पंढरपूर येथे दाखल होत असतात. त्यांच्या बंदोबस्तकरिता सोलापूर ग्रामीण पोलीस व बाहेर जिल्ह्यातून मागणी केलेले एकूण सुमारे दहा हजार पोलीस हे व्यस्त राहणार आहेत. या कालावधीत सराईत गुन्हेगार, दोन व दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगार तसेच हिस्ट्री सीटर व क्रिमिनल गुंडा यांनी कोणतेही शांतता व सामाजिक सुव्यवस्था बिघडू नये यासाठी श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी त्यांना सोलापूर येथील पोलीस मुख्यालय येथे पाचारण केले होते.
यामध्ये अक्कलकोट,बार्शी, मंगळवेढा या उपयोगातील सुमारे २७२ गुन्हेगार हजर होते. यावेळी पोलीस अधीक्षकांनी त्यांना शांतता राखण्याबाबत आवाहन करुन या पुढील काळात कोणताही दखलपात्र गुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. तसेच त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे.
यावेळी श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री. संजय जगताप, पोलीस निरीक्षक सानेगुनी शाखा व त्यांचे सहकारी हजर होते.
Post Views: 7