पंढरपूर – शास्त्रीयसंगीताचे संशोधन केंद्र पंढरपूर येथे होण्यासाठी निश्चितपणेप्रयत्न करुअसे आश्वासन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीदिले. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या पं.विकास कशाळकर फाऊंडेशन पंढरपूर यांचे वतीने गुरुवर्य पं.विकासजी कशाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी वेळी मार्गदर्शन करताना प्रशांत परिचारक बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.प्रसाद कुलकर्णी यांच्या गंधार क्लासेसच्या शिष्यवृंदानी चतुरंग गायन सादर केले. प्रशांत परिचारक,पं.विकास कशाळकर,पद्मश्रीउल्हासजी कशाळकर, पद्मश्री तालयोगी सुरेशजी तळवलकर गुरुजी,पं.अरूणकाका कशाळकर, अध्यक्ष डॉ.प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष उदय उत्पात,सचिव ज्ञानेश्वर दुधाणे, एस.पी.कुलकर्णी, आण्णासाहेब सुरवसे, माधूरी जोशी, शुभांगी मनमाडकर, स्वानंदी काणे, प्रज्ञा कुलकर्णी, पारुल पारमार यांचे हस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या नंतर दीपप्रज्वलन करुन पं.विकास कशाळकर यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ दिव्यांचे औक्षण करून परिचारक यांचे हस्ते कशाळकर यांचा सत्कार संपन्न झाला.
यावेळी तालयोगी सुरेश तळवलकर गुरुजी,पं.विकास कशाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक यांची मनोगत झाली.
यावेळी बोलताना विकास कशाळकर यांनीसांगितले की कशाळकर परिवार संपूर्ण अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताला वाहून घेतलेला परिवार आहे.अनंत विद्यार्थी विद्यार्थिनी तयार करून त्यांनी संस्कारित आणि सुसंस्कृत पिढ्या तयार करण्याच कष्ट घेत असल्याने भारतीय गुरु शिष्य परंपरा टिकवून ठेवली आहे असे सांगत त्यांनी पंढरपूर येथे अभिजात शास्त्रीय संगीताचे संशोधन केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
यावेळी बोलताना प्रशांत
परिचारक यांनी पंढरपूर शहराची सांगितिक परंपरा मोठीअसून ते टिकवण्यासाठी प्रसाद कुलकर्णी, ज्ञानेश्वर(माऊली)दुधाणे सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांना निश्चितच पाठिंबा राहील असे सांगत लवकरच संतनामदेव आध्यात्मिक पीठ बनवण्यासाठीचा प्रस्ताव तयार होत आहे. त्यामध्ये लवकरच आपण मागणी केल्याप्रमाणे शास्त्रीय संगीताचं संशोधन केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करुन प्रस्ताव देण्याचे आवाहन केले.
त्यानंतर पद्मश्री उल्हास कशाळकर यांच्या सुश्राव्य गायनाला सुरुवात झाली.त्यांनी विलंबित तीनतालत राग केदार सादरकरत पंढरपूरकर कला रसिकांना शास्त्रीय संगीताची अविस्मरणीय अनुभूती दिली. त्यानंतर बहार राग सादर करत विठोबाचे पायी मन धाव घेई, आणि दीपचंदीमध्ये विठूरायाची अभंगरचना सादर करत गायनाची सांगता केली.यावेळी त्यांना तितकीच सुंदर आणि दमदार साथसंगत तबला पद्मश्री तालयोगी सुरेशजी तळवलकर, हार्मोनियम डॉ प्रवीण कासलीकर, पखवाज ज्ञानेश्वरदुधाणे, टाळ आण्णासाहेबसुरवसे आणि स्वरसाथ सौरभ नाईक, अद्वैत केसकरयांनी करत कार्यक्रम उंचीवर नेऊन ठेवला.
यावेळी दिल्ली, नागपूर, मुंबई,पंढर
पूर, सोलापूर, पुणे,सांगोला, कोल्हापूर, करकंब, गावच्या पंचक्रोशीतील अनेक कला रसिक आणि शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश खिस्ते यांनी केले. एस.पी.कुलकर्णी यांनी आभार मानले.


























