सांगोला – खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगोला तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीस सांगोला तहसीलदार बाळुताई भागवत, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत टेंभू-म्हैसाळचे पाणी वाटप नियोजन, निरा उजवा कालव्याच्या पाण्याचे नियोजन, जलजीवन मिशनमधील रखडलेली कामे, दुष्काळग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, विविध जलपुरवठा योजना तसेच विजेच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. उद्भवलेल्या अडचणींवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























