पंढरपूर – श्री अत्रेयज्योतिष वास्तू-अध्यात्म संस्था तथा सद्गुरु अण्णा महाराज दत्तप्रबोधिनी, मुंबई यांच्यासंयुक्त विद्यमाने पंढरपूर मांजरादेवी संस्थेमध्ये एकदिवसीय ज्योतिष व वास्तूअधिवेशन उत्साहात संपन्न झाले. राज्यभरातील ज्योतिषाचार्य, वास्तुतज्ज्ञ, अध्यात्मअभ्यासक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले.
या अधिवेशनात आधुनिक काळातील ज्योतिषशास्त्राची उपयुक्तता, बदलत्या परिस्थितीत ज्योतिषांनी स्वीकारावयाच्या नवीन पद्धती, जातकांना शास्त्रशुद्ध व सकारात्मक मार्गदर्शन करण्याचे तंत्र तसेच ज्योतिष शास्त्राचे वैज्ञानिक पैलू यांवर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विविध चर्चासत्रे, व्याख्याने व संवाद सत्रांमधून उपस्थित ज्योतिषाचार्यांना मौल्यवान माहिती मिळाली.
कार्यक्रमास विजय जकातदार (पुणे), पंचांगकर्ते मोहनरावदाते (सोलापूर), डॉ.प्रसन्न मुळे (रत्नागिरी), राधेश बादले पाटील (पंढरपूर), अंजली पोतदार(पुणे), गुरुश्रीप्रियाताई मालवणकर (मुंबई), प्रकाश गोडसे, ओंकार दाते, अॅड.रश्मीबिडकर, अंजली गाडे, प्रा.दत्तप्रसादशिरगुरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या संपूर्ण अधिवेशनाचे आयोजन श्री अत्रेय ज्योतिष वास्तू-अध्यात्म संस्थेच्या सर्वेसर्वा गुरुश्री प्रियाताई मालवणकरयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमात पंचांगकर्ते मोहनराव दाते यांना ‘धर्मभूषण’पुरस्काराने गौरविण्यात आले, तर पंढरपूरचे प्रसिध्द ज्योतिर्विद तथा लेखक राधेश बादले पाटील यांना ‘ज्योतिष कार्य गौरव पुरस्कार’प्रदान करण्यात आला. तर ज्योतिर्विद, लेखक व प्राध्यापक अभिजीत अवताडे-उपाध्ये यांना ज्योतिष, अध्यात्म, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘अध्यात्म उपासना शिरोमणी’ हा प्रदान करुन गौरविण्यात आले. याबरोबरच आरती घाटपांडे, डॉ.विकास खिलारे, श्रीनिवास रामदास यांच्यासह अनेकमान्यवरांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानितकरण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी पंचांग करते मोहनराव दाते यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीमध्ये धार्मिक विषयावर लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी समाधान पूर्वक दिली. त्यामुळे उपस्थितांचे समाधान झाले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर
समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कोणतेही शास्त्र हे कधीच खोटे ठरत नाही, ज्योतिषशास्त्र तर नाहीच नाही असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना ठासून सांगितले.त्यामुळे उपस्थितांनी त्यांच्या विचारांना भरभरून दाद दिली.
Post Views: 10