सोलापूर – कुमठे येथील अतिशय क्षेत्र 1008 श्री. चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पर्युषण पर्व संपन्न झाला. रोज सकाळी भगवंतास महाअभिषेक पूजा तसेच महिलाकडून दशलक्षण पूजा करण्यात येत होती. आज क्षमावली दिवस असल्याने मंदिरात सर्व श्रावक श्राविकानी एकमेकांना माफी मागून क्षमा वाली साजरी केली. तसेच काल झालेल्या उपवासामुळे सर्वांनी साखर सुंट देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील, उपाध्यक्ष नितीन कासार, सचिव वालचंद पाटील, प्रथमेश कासार, सचिन कासार, महावीर पानपट, रवींद्र कासार, मनोहर कासार, अनिल पाटील, सचिन पाटील ,भाग्येश पाटील, आनंद पाटील, विक्रांत पाटील, सागर पाटील, सुलचंद लोखंडे, प्रसन्न लोखंडे, अजित पाटील, अमोल पाटील, किरण पाटील, नितीन पाटील, संदीप पानपट, संजय पानपट, अशोक पाटील, सत्वसेन पाटील ,ललित कासार, चंदन कासार, महेश पाटील, ओम पाटील, देवेंद्र कासार, अभिषेक कासार, चंद्रकांत कासार, महेश आहेरकर, तसेच महिलावर्ग आदींनी एकमेकांना क्षमा मागून क्षमावली साजरी केली.
Post Views: 5