करमाळा – आमदार झाल्यानंतर तालुक्याचा विकास व जनतेची कामे करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये झालेल्या दारून पराभवामुळे पाटील गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य घालवण्यासाठी स्वयंघोषित प्रवक्त्याने बागल गटा संदर्भात विधानसभेच्या उमेदवारी विषयी बातम्या पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला असून विनाकारण आशा बातम्या प्रसिद्ध करून तालुक्यातील मूळ प्रश्नापासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असून मी यावर एवढेच म्हणेल, हत्ती चले बजार, कुत्ते भुंकते है हजार.. असे मत मकाई कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे व्यक्त केले आहे
करमाळा तालुक्यातील जनता सुज्ञ असून या स्वयंघोषित प्रवक्त्यास जनता पुर्वीपासून ओळखते त्याच्या अशा गोष्टी फारश्या गांभीर्याने घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही
पाटील गटाचे स्वयंघोषित प्रवक्ता सुनील तळेकर यांनी येणाऱी विधानसभा निवडणुकीत बागल उमेदवार देणार नाहीत अशा प्रकारच्या पुड्या सोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.तो हास्यास्पद आणि निव्वळ भंपक पणाचे आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विधानसभेला चुकीच्या व्यक्तीला निवडून दिल्याचा मतदार संघातील जनतेला पाश्चाताप होत असून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये जनतेने ते दाखवून दिले आहे. या गोष्टीचे त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे.
गत विधानसभेला त्यांच्यासोबत असणाऱ्या मोहिते पाटील गट, जयवंतराव जगताप गट व ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्या पक्षाचा स्वार्थी प्रवृत्तीमुळे विसर पडला आहे.यापुढे पाटील गटावर कोणताच पक्ष विश्वास ठेवणार नाही अशी चर्चा गावागावात व पारावर सुरू आहे.तसेच भविष्यात येणाऱ्या कालावधीमध्ये किती कार्यकर्ते त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत,याची काय कारणे आहेत ते आधी संबंधितांनी तपासावीत व नंतर बागल गट व बागल कुटुंबा विषयी बोलावे. तालुक्यातील राजकारणावर बोलून तोंडाची वाफ दवडू नये व विनाकारण यामध्ये लुडबुड करू नये .व अशा लोकांनी बागल गटा विषयी बोलणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे.जिल्हा परिषद भाजपा गट नेत्या रश्मी दिदी बागल व भाजपा नेते दिग्विजय भैय्या बागल यांचे काम अत्यंत जोमाने सुरू आहे. व त्यांचाच धसका घेऊन कुणी काय बरळत असेल तर त्याच्या कडे लक्ष देण्याची गरज नाही, येणाऱ्या काळात विधानसभेत कोणाला पाठवायचे हे जनताच ठरविणार आहे असे हि शेवटी म्हटले आहे.




















