Friday, July 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आषाढी वारीसाठी ४५०० औषध किटचे नियोजन 

तरुण भारतbyतरुण भारत
July 10, 2026
in solapur
0
आषाढी वारीसाठी ४५०० औषध किटचे नियोजन 
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – आषाढी वारी २०२६ दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून, यंदा ४५०० औषध किटचे वितरण करण्यात येणार आहे. वारी मार्गावरील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या किटचे नियोजन करण्यात आले असून, त्याच्या वितरणासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. यासमितीच्या कामकाजाची संपूर्ण जबाबदारी साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड यांनी दिली.
              वारीदरम्यान वारकऱ्यांना तातडीची आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक वैद्यकीय पथकाला आवश्यक औषध किट पुरविण्यात येणार आहे. या किटमध्ये ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या, निर्जलीकरण, अॅलर्जी, जखमा तसेच इतर सामान्य आजारांवरील औषधांसह प्राथमिक उपचारासाठी लागणारे साहित्य उपलब्ध असेल. त्यामुळे किरकोळ आजारांवर त्वरित उपचार करणे शक्य होणार असून, वारकऱ्यांना मोठ्या आरोग्य केंद्रात जाण्याची आवश्यकता कमी होईल.
        औषध किटचे वितरण पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावे, यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. कोणत्या आरोग्य पथकाला किती किट द्यायचे, कोणत्या ठिकाणी अतिरिक्त साठा ठेवायचा आणि गरजेनुसार तातडीने पुरवठा कसा करायचा, याचे नियोजन समितीकडून करण्यात आले आहे. वारी मार्गावरील प्रत्येक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध राहील, याची दक्षताही घेण्यात आली आहे.
           याशिवाय, जिल्हा आरोग्य विभागाने जीवनरक्षक औषधे, इंजेक्शन्स, ओआरएस पावडर, आयव्ही फ्लुईड्स, ऑक्सिजन, सलाईन, बालकांसाठी आवश्यक सिरप तसेच विविध संसर्गजन्य आजारांवरील औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध करून ठेवला आहे. तसेच एचबीएसएजी, व्हीडीआरएल, सर्पदंश निदान किट यांसारख्या आवश्यक निदान किटही आरोग्य पथकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
            वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन वैद्यकीय पथके २४ तास सेवेत राहणार आहेत. यांसह उष्माघात, हृदयविकाराचा झटका, अॅनाफिलॅक्सिस, सर्पदंश किंवा इतर गंभीर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपचार करता यावेत, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
कोट
४५०० औषध किटचे नियोजन
आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून लाखो भाविकांचा श्रद्धेचा महोत्सव आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित, निरोगी आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने केलेले हे नियोजन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. विशेषतः ४५०० औषध किटचे नियोजन, त्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना आणि साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी यामुळे वारी मार्गावरील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक होणार असल्याचा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड यांनी व्यक्त केला आहे.
Post Views: 10
Previous Post

मनपा आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी  चार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next Post

कंत्राटी सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी मनपा शिक्षण विभागाचा माणुसकीचा हात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कंत्राटी सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी मनपा शिक्षण विभागाचा माणुसकीचा हात

कंत्राटी सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी मनपा शिक्षण विभागाचा माणुसकीचा हात

ताज्या बातम्या

बी-टूच्या निर्णयानंतर चाळींमध्ये फटाक्यांची आतषबाजी

बी-टूच्या निर्णयानंतर चाळींमध्ये फटाक्यांची आतषबाजी

July 10, 2026

पंढरपूर–लोणंद रेल्वे मार्गाला गती; शेतकरी, नागरिकांच्या प्रश्नांवर थेट चर्चा

July 10, 2026

समाज कल्याण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांचा पदभार गायकवाड अन् रणदिवेंकडे निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी

July 10, 2026

समाज कल्याण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांचा पदभार गायकवाड अन् रणदिवेंकडे 

July 10, 2026
यमाईतांडा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यांवर छापे; लाखोंचे रसायन जप्त, ५ आरोपींवर गुन्हे दाखल!

यमाईतांडा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यांवर छापे; लाखोंचे रसायन जप्त, ५ आरोपींवर गुन्हे दाखल!

July 10, 2026

कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर; भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळणार पाच तास वीजपुरवठा 

July 10, 2026

धनश्री महिला पतसंस्थेच्या कर्जदारास चेक बाऊन्ससमध्ये शिक्षा कायम, आरोपीची तुरुंगात रवानगी

July 10, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0968473

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!