धाराशिव – शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे २३ एप्रिल हा दिवस “जागतिक पुस्तक दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांचे महत्त्व समजावे आणि ज्ञानवृद्धीला चालना मिळावी या उद्देशाने स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिक व्यक्तिरेखा साकारत कार्यक्रमात रंगत आणली.
शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे महत्त्व पटवून दिले. पुस्तकांमुळे विचारशक्ती वाढते, ज्ञान समृद्ध होते आणि व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जागतिक पुस्तक दिनानिमित्त शाळेत आनंदी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका स्वाती नरवडे मॅडम यांनी केले.
याप्रसंगी स्कूलचे उपप्राचार्य निलेश जाधव सर, कार्यक्रमाधिकारी सुप्रिया रायगुडे मॅडम, व्यवस्थापकीय अधिकारी प्रदीप शिंदे सर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























