पंढरपूर – तालुक्यातील लक्ष्मी टाकळी पंढरपूर येथे अवैद्य दारू विक्रेत्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करीत तब्बल १६ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त आहे.
या कारवाई बाबतची सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावातील हॉटेल शाहीदरबारच्या बाजुला एका पत्राशेडच्या बाजुस एक इसम अवैधपणे देशीविदेशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने येथील उपविभागीय पोलिसअधिकारी प्रशांत डगळे यांनी आपल्या कार्यलायातील पोलिसांकडून त्या ठिकाणी कारवाई केली.
या कारवाई दरम्यान श्रीराम नगरकडे जाणारे कच्च्या रोडवरील पत्राशेडचे बाजुला पोलिस पथकाला एक इसम पांढरे रंगाची पिशवी घेवून थांबलेला दिसला, पोलीस पथकासत्याचा संशय आल्याने त्यास गराडा घालून जागीच पकडले.
यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली असताशरद बाळासाहेब रणदिवे ( रा.क्रांतीवीरलहुजीवस्तादनगर, टाकळी रोड, पंढरपूर ) असे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान पोलिसांनी त्याच्या जवळील पिशवी तपासून पाहता त्यामध्ये १६ हजार ३० रुपये किंमतीचा देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल आढळून आला. शरद रणदिवे हा अवैधरित्या त्याची विक्री करत असताना मिळून आलेने पोहेकॉ ताजुद्दीन मुजावर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस महा. प्रव्ही.अधि. कलम ६५ (ई) प्रमाणे फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक प्रशांत डगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मुजावर, पोना गायकवाड, पोकॉ लोंढे, पोकॉ हुलजंतीयांनी पार पाडली.
——————–
चौकट : ( उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचेजनतेला आवाहन )
पंढरपूर यांनी पंढरपूर शहर वतालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे अवैधधंदे चालु असल्यास आम्हास संपर्क करावा व यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकादेशीरकृत्य अथवा अवैध धंदे सुरू ठेवील अशा समाजविघातक लोकांवर प्रचलित कायदयानुसारअत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची यापुढे गय केली जाणार नाही असेही उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी सांगितले.
Post Views: 10