अक्कलकोट – तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या
पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत. तालुक्यातील सुमारे ३००
शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एकूण ३० हजार ६९२ मोफत पाठ्यपुस्तक संच शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत.
जिप शाळा अनुदानित खाजगी शाळा आश्रमशाळामध्ये … पुस्तकाचे वितरण शाळांना करण्यात आले आहे.
तालुक्यातील मराठी, कन्नड व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके दिली जाणार आहे यंदा शिक्षण विभागाने वेळेपूर्वी नियोजन करून वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
२०१६-१७ च्या यू-डायस नोंदिनुसार विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारावर पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मराठी माध्यमासाठी २० हजार ४३० संच, कन्नड माध्यमासाठी ३ हजार ४५० संच आणि उर्दू माध्यमासाठी १ हजार ४०७ संच उपलब्ध झाले आहेत. याशिवाय इतर काही आवश्यक पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.
राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने इयत्ता दहावीची पाठ्यपुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत. तसेच सेमी-इंग्रजी माध्यमातील काही पुस्तके आणि सहावीच्या काही विषयांची पुस्तके येणे बाकी आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू आहे. तालुकास्तरावरून शाळास्तरावर पाठ्यपुस्तके तातडीने पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाचे समन्वयक गोविंद राठोड व गौरीशंकर कोळी यांच्यासह विभागातील कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
Post Views: 9