बार्शी – अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे यांचे नवोदित कवी साहित्य संमेलन धाराशिव येथे संपन्न झाले. त्यावेळी सभागृहामध्ये संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार राऊत, डॉ. शरद गोरे, आमदार विक्रम काळे, आमदार कैलास पाटील, फुलचंद नागटिळक यांच्या हस्ते अखिल भारतीय साहित्य परिषद सोलापूर विभागाचे अध्यक्ष पंडितराव लोहोकरे तात्या यांचा सत्कार व कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांचे जीवनाचा उपासक हा ग्रंथ त्यांना प्रदान करण्यात आला.
कर्मवीर लोहोकरे गुरुजींनी बहुजनांसाठी मोठे कार्य केले आहे. ग्रामीण भागात शाळा, वसतिगृह, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्र उभा केली. त्यामुळेच आज गौडगावचे नांव महाराष्ट्र राज्य झाले आहे. पंडितराव तात्या हे लोहोकरे गुरुजींचे चिरंजीव आहेत.