सोलापूर : श्रीक्षेत्र शेगांव निवासी श्री संत गजाजन महाराजांची पालखी टाळमृदुंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या स्वराने कुचन प्रशालेच्या प्रांगणात आगमन झाली. संस्थेनी पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून वेगवेगळया रंगानी रांगोळी काढून सजविले, रांगोळी व फुलांच्या पायगड्या घातल्या.
पद्मशाली शिक्षण संस्थेने पालखी आगमन झाल्यानंतर पालखीचे भव्य स्वागत करुन संस्थेचे अध्यक्ष अॅड्. श्रीनिवास क्यातम, सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम व खजिनदार गोवर्धन कमटम यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करुन श्री संतांचे मनोभावे पूजन करुन दर्शन घेतले. तसेच यावेळी सोलापूर शहर मध्यचे आमदार मा. श्री. देवेद्रदादा कोठे हे सपत्नीक उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले.
यंदा पालखी आगमनाचे ५७ वे वर्ष होते. प्रशालेच्या प्रांगणात स्वागतासाठी प्रशालेचे बँड पथक सज्ज
होते. संध्याकाळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती. केलेले होते. माऊलींच्या टाळमृदुंगानी संपूर्ण परिसर दुमदुमून गेले. वारकरी संप्रदाय व भगव्या फताकांनी परिसर फुलून गेले
यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम, मधुकर कट्टा, सौ. संगीता इंदापुरे, विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा, प्रभाकर आरकाल, श्रीनिवास अं. गड्डम, नरेश श्रीराम, अंबादास गज्जम, श्रीनिवास इप्पाकायल व संस्थेचे माजी अध्यक्ष काशीनाथ गड्डम ज्येष्ठ माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, माजी नगरसेवक सौ. कुमुदिनी अंकाराम, यशवंत इंदापुरे, प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, श्रीमती प्रणिता सामल तसेच प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते