बार्शी – चाळकवाडी, ता जुन्नर , जि पुणे येथील शिवांजली साहित्यपीठ यांच्यातर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय शिवांजली साहित्य पुरस्कार डॉ. सुनील विभुते यांच्या ‘जागतिक दर्जाचे निवडक दहा जीवशास्त्रज्ञ’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र व आकर्षक स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण शनिवार दि २ मे २०२६ रोजी संत गाडगेबाबा साहित्यनगरी, शिवांजली शैक्षणिक संकुल, चाळकवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ३३ व्या राज्यस्तरीय मराठी साहित्य महोत्सवामध्ये होणार आहे.
डॉ सुनील विभुते यांच्या यशाबद्दल प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. ज्येष्ठराज जोशी, प्रसिध्द विज्ञान साहित्यिक डॉ. पंडीत विद्यासागर, डॉ. संजय ढोले, डॉ. छाया पाटील, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव व सर्व पदाधिकारी, बार्शी रेडक्रॉस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. विक्रम निमकर, सोलापूर मसापच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर, पद्माकर कुलकर्णी, बार्शी मसापचे निपाणीकर व विविध साहित्य संस्थांचे पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

























