पंढरपूर – मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’च्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉलेज समिट २०२६’ मध्ये येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्रतिनिधित्व करताना संस्थेला ‘व्हॅल्यूड पार्टनरशिप अवॉर्ड’ आणि ‘प्रशस्तिपत्रक’ (सर्टिफिकेट ऑफ अप्रेशिएशन) देऊन सन्मानित करण्यात आले. वाणिज्य महाविद्यालय (एमएमसीसी) चे प्राचार्य किशोर निकम यांच्या हस्ते ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर यांनी संस्थेच्या वतीने हा सन्मान स्विकारला.
याच समिटमध्ये स्वेरीच्या एमसीए विभागाचे प्रमुख प्रा. मनसब शेख यांचाही विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी केलेल्या कार्याच्या अनुषंगाने त्यांचा गौरव करण्यात आला.
याबरोबरच या कार्यक्रमात स्वेरीच्या उपप्राचार्या डॉ. श्रीमती मिनाक्षी पवार आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. अभिषेक एम. एस. यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यापूर्वी स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यंदाचा ‘व्हॅल्यूड पार्टनरशिप अवॉर्ड’ स्विकारल्यानंतर अधिष्ठाता प्रा. रविराज माढेकर यांनी सांगितले की, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नवीन तंत्रज्ञानामुळे आधुनिक कार्यक्षेत्राचे स्वरूप वेगाने बदलत आहे. या बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांशी (टेक कंपनीज्) मजबूत भागीदारी निर्माण करणे हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. या समिटमधून मिळालेल्या अनुभवाचा आणि विचारांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकास (स्किल डेव्हलपमेंट) घडवून आणण्यासाठी तसेच महाविद्यालयात प्रभावी कॅम्पस प्लेसमेंट उपक्रम राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असा विश्वासही प्रा. माढेकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी एमसीए विभागप्रमुख प्रा. मनसब शेख यांनीही मनोगत व्यक्त केले.
दरम्यान स्वेरीला मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. मांडवे, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. बनकर, पदवी इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























