मंगळवेढा – मंगळवेढा ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर इंचगाव येथे असलेल्या टोळ नाक्यावर नियोजनाचा अभाव असल्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याचे विदारक चित्र असून या बेजबाबदार कामकाजाबाबत वाहन चालकामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सोलापूर अभियंता यांनी याकामी लक्ष घालून संबंधीतावर कारवाई करण्याची होतेय मागणी.
मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंचगाव येथे टोळ नाका आहे. या टोळ नाक्यावर एकूण 8 वाहन जाण्यासाठी लेन असून नियोजनाअभावी केवळ 3 लेनच सुरू असल्यामुळे वाहनाच्या लांबलचक रांगा लागून येथे गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी प्रवास करणार्या प्रवाशांना व वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनाच्या गर्दीमुळे लेनमध्ये उभे असलेले वाहन पुन्हा वाहन चालक जिकडे लेन मध्ये कमी वाहनांची संख्या कमी आहे त्या लेनमध्ये वाहन आधूनमधून घेवून जात असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. येथील प्रशासनाचे कुठलेही नियोजन नसल्यामुळेच हा प्रकार घडत असल्याच्या वाहन चालकानी संताप व्यक्त करीत माध्यमाजवळ तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे प्रवाशांना त्रास होवू नये यासाठी टोळ नाक्यावर फास्ट सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे इंचगाव येथे मात्र त्या विरूद्ध चित्र पहावयास मिळते आहे. सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता यांनी या कामी लक्ष घालून कर्तव्यात कुचराई करणार्या अधिकारी व कर्मचार्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
फोटो ओळी- मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामर्गावर इंचगाव टोळनाक्यावर कर्मचार्यांच्या नियोजनाअभावी वाहनांची होत असलेली गर्दी छायाचित्रात दिसत आहे. (छाया ः प्रथमेश राजे नागणे ,मंगळवेढा)
———–
मंगळवेढा -हुलजंती मार्गावर अज्ञात वाहनाने मोटर सायकलस्वारास धडक दिल्याने एकाचा मृत्यू
अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल…..
तभा वृत्तसेवा
मंगळवेढा दिनांक 31 ऑगस्ट 2026
मंगळवेढा ते हुलजंती मार्गावर अज्ञात चार चाकी वाहनाने भरधाव वेगात येवून दुचाकीस्वारास धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी निलेश विष्णू गवळी (रा.भालेवाडी) यांचा चुलत भाऊ तथा जखमी मयत सुधीर गवळी हे दि.22 ऑगस्ट रोजी हे मोटर सायकलवरुन हुलजंती कडे येत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघातानंतर वाहन न थांबता निघून गेले. खाजगी अॅम्ब्युलन्स बोलावून जखमीस मंगळवेढा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना दि.30 रोजी दुपारी 2 वाजता सुधीर शिवाजी गवळी (वय 35 वर्षे, रा.भालेवाडी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकी स्वारास जोराची धडक देवून सुधीर याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालका विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 16