Wednesday, September 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पावसाचा खंड ; यंदा ऑक्टोबर ऐवजी सप्टेंबर महिन्यातच  पीक कापणी प्रयोग

तरुण भारतbyतरुण भारत
September 16, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पावसाने मोठा खंड दिल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी पिके सुकून गेली आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर पीक काढून पुढील पिकासाठी जमीन तयार करण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत पीक काढण्यापूर्वीच पीक कापणी प्रयोग घेण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. पीक नुकसान आणि पिकांच्या स्थितीचा विचार करून पीक कापणी प्रयोग वेळेत घेण्याची मागणी आपण केली होती. त्यानुसार ऑक्टोबर ऐवजी सप्टेंबर महिन्यात पिक कापणी प्रयोग घ्यावे असे निर्देश कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोगाच्या आधारे संबंधित महसूल मंडळातील पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत झालेली घट विचारात घेऊन नुकसानभरपाई निश्चित केली जाते. त्यामुळे पीक कापणी प्रयोग अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. सामान्य  परिस्थितीत पीक कापणीस तयार झाल्यानंतर कापणी प्रयोग घेतला जातो. मात्र, अवर्षण, अतिवृष्टी, पूर किंवा मोठ्या प्रमाणातील कीड-रोगामुळे पीक वाया जाण्याची अथवा नष्ट होण्याची शक्यता असल्यास आणि शेतकऱ्याला मुदतपूर्व पीक काढावे लागण्याची परिस्थिती उद्भवल्यास, संबंधित शेतात वेळेआधी पीक कापणी प्रयोग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळी कागदावरील आकड्यांपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर असलेल्या वास्तविक उत्पादनाची नोंद करणे बंधनकारक आहे. पीक कापणी प्रयोगातून नोंदविलेले वास्तविक उत्पादन हे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ‘पीक सुकले म्हणून काढून टाकू’ असे न करता, आधी पीक कापणी प्रयोग करून घेणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.पावसाच्या खंडामुळे अनेक शेतकऱ्यांना मुदतपूर्व पीक काढावे लागू शकते. अशा शेतकऱ्यांचे नुकसान योग्य पद्धतीने नोंदवले जावे आणि त्यांना विमा योजनेचा दिलासादायक लाभ मिळताना अडचण येऊ नये, यासाठी हा विषय सातत्याने आमदार पाटील यांनी शासन दरबारी मांडला. आता कृषी आयुक्तांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. संबंधित शेतकरी बांधवांनी यंत्रणेशी संपर्क साधून पीक कापणी प्रयोग पूर्ण करून घ्यावा, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

शेतकरी बांधवांनी काय करावे?
धाराशिव जिल्ह्यात उडीद, मूग व सोयाबीन या पिकांचे एकूण १,०६९ प्लॉट पीक कापणी प्रयोगासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या प्लॉटधारक शेतकरी बांधवांनी पीक काढण्यापूर्वी महसूल, कृषी किंवा ग्रामविकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी. शेतकऱ्यांनी सूचना दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पीक कापणी प्रयोग पूर्ण करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पीक कापणी प्रयोग पूर्ण होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पीक काढू नये.पीक
कापणी प्रयोगासाठी निवडण्यात आलेल्या प्लॉटमध्ये उत्पादन शून्य असल्यास विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या समक्ष पंचनामा करूनच पुढील कार्यवाही करावी. पंचनाम्यासोबत नुकसानग्रस्त क्षेत्राचे Geo-tagged छायाचित्र जोडणे, पंचनामा CCE Agri App वर अपलोड करणे तसेच त्याची प्रत विमा कंपनीच्या प्रतिनिधीला देणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन शेतकरी बांधवांना पीक विम्याचा लाभ मिळेपर्यंत आपला पाठपुरावा चालू राहणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Post Views: 12
Previous Post

नेहरू वसतिगृहातील १३ गाळेधारकांना नोटिसा करारभंग, विनापरवानगी हस्तांतरण आणि पोटभाडेकरूंवर जिल्हा परिषदेचा बडगा

Next Post

श्री शिवाजी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी व आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री शिवाजी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी व आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

श्री शिवाजी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी व आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

ताज्या बातम्या

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी पूजा

September 16, 2026
श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

September 16, 2026
जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

September 16, 2026
मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

September 16, 2026
गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

September 16, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

September 16, 2026

 म्हशी उधळल्याच्या कारणावरुन दाम्पत्याला बेदम मारहाण; पत्नीच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर

September 16, 2026

गावठी पिस्टल, चाकू, तलवार आणि कार जप्तप्रकरणी आरोपीचा जामीन मंजूर

September 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1217317

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!