धाराशिव – जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष वंचित विकास संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते वाशीचे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ लगाडे यांना नुकताच राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मात्र सन्मान पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी केलेल्या मुले आणि स्त्रिया दीनदली छोटे शेतकरी शेतमजूर यांच्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
हा पुरस्कार अमरावतीच्या अंबाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे हा पुरस्कार अंबाई अध्यक्ष माधुरी चव्हाण.प्रशांत कंकाळे यांनी जाहीर केला असून कांचन रिसॉर्ट नवसारी चौक अमरावती या ठिकाणी मोठ्या थाटामाटा 11 एप्रिल 2026 रोजी क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिवशी पुरस्कार अमरावती येथे देण्यात येणार आहे त्यामुळे वंचित विकास संस्थेच्या कार्यावर मीनाताई कुर्लेकर सुनिता जोगळेकर तृप्ती देसाई देवयानी गोंगले व वाशी परिसरातील लोकांनी त्यांची कौतुक केले आहे.














