सोलापूर : जय बजरंग समाजसेवा तरुण मंडळ संचलित मयुरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर नूतन पदाधिकारी निवड व नियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली.बैठकीत गणेशोत्सवाचे नियोजन, विविध उपक्रम तसेच मिरवणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
उत्सव अध्यक्ष म्हणून रवि ढोबळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी स्वप्नील राऊत व ऋषिकेश डोके, खजिनदार अभिषेक गिरी, उपखजिनदार पवन खुळे, तर सचिवपदी माऊली क्षीरसागर व शुभम तलाठी यांची निवड झाली.मिरवणूक प्रमुख प्रशांत नारगुडे, कार्याध्यक्ष गुरु माने व आकाश गार्लेपल्ली, सोशल मीडिया प्रमुख प्रणव मस्तुद व अजय गेजगे, तसेच पुजारी म्हणून प्रदीप शिंदे यांची निवड करण्यात आली.
बैठकीस मंडळाचे सल्लागार पितांबर गोरे, तानाजी बेलेराव, बीबीषण कांगडे, शशिकांत साठे, प्रभुलिंग कलाल, विजय शिंदे, सुधाकर कांगडे, प्रदीप गोरे, गणेश नरळे, कपिल कांगडे, प्रविण गोरे, केशव वाघमोडे, ज्वाला भडंगे, बाळासाहेब बेलेराव, सागर दांडेकर, श्याम वाघमारे, दगडू नारगुडे, जनार्धन बेलेराव, अक्षय शिंदे, भाऊसाहेब बेलेराव व समाधान देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 9