टेंम्पो दि. 18/07/2026 रोजी पकडला होता. त्यातील तांदळाचा नमुना जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांचेकडे पत्र दि. 18/07/2026 रोजी पाठविला होता. परंतु त्याचा तपासणी अहवाल आमच्या कार्यालयाकडे उपलब्ध नाही.
टेंम्पो मालकाचे नाव,पत्ता याबाबत – हे वाहन पोलीस खात्याने जप्त केले असल्याने ही माहिती महसूल कार्यालयाकडे उपलब्ध नाही.
टेंम्पो पकडला व सोडला कधी? सॅम्पल कधी घेतले? ही माहिती तालुका पोलीस मंगळवेढा यांचेकडून घ्यावी.
चौकट-
पुरवठा विभागाने माहीती आधिकाराखाली खोटी माहीती दिलीय. पोलीस सांगतात पुरवठा विभागाच्या पत्राच्या आधारे धान्याचे वाहन सोडले,मग खर कोण खोट कोण? हे जनतेनेच ठरवावे,टँपो मारापुर येथील आहे,साखळी पध्दतीने आर्थीक तडजोडीतुन टँपो सोडला आहे, मी माहिती अधिकाराखाली वरीष्टाकडे अर्ज करून संपुर्ण घोटाळा बाहेर काढणार आहे
– नारायण गोवे,
मनसे जिल्हा समनवय,मंगळवेढा.
फोटो ओळी-धान्य घेवून काळबाजारात जाणारा छायाचित्रात दिसणारा हाच तो टेम्पो सोडून देण्यात आला आहे.

















