अकलूज – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गगनभेदी घोषणा, पारंपरिक वाद्यांचा कडकडाट आणि अबीर-गुलालाची उधळण करत सायंकाळी सहा वाजता गांधी चौक येथून मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रचंड उत्साहात सुरुवात झाली तत्पूर्वी सकाळपासूनच घरगुती श्री गणपतीचे विसर्जन नीरा नदीकाठी . नागरिक येऊ लागले होते शनी मंदिराजवळील देशमुख घाट किल्ल्याजवळील खाटीक घाट महादेव मंदिराजवळील कुंभार घाट याबरोबर सराटी येथेही विसर्जनाची सोय करण्यात आली होती यंदाची विसर्जन मिरवणूक तांत्रिक दणदणाटापेक्षा पारंपरिक संस्कृतीचा अनोखा संगम ठरली यावर्षीची मिरवणूक खास आकर्षण म्हणजे डॉल्बींमुक्त मिरवणूक पारंपारिक वाद्यामध्ये लेझीम गजी ढोल महिलांच्या टिपऱ्या हलगी आणि संबळ वाद्य ही सहभागी झाले होते कोणताही गोंगाट आणि कर्कश आवाज विना हि मिरवणूक अतिशय सुंदर पार पडली
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांनी आयोजित केलेल्या मिरवणूक सजावट स्पर्धेसाठी एकूण 56 गणेशोत्सव मंडळाने असा होता या सर्वांचे नगर परिषदेच्या वतीने व मध्यवर्ती गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष शिवते सिंह मोहिते पाटील नगराध्यक्षा रेश्मा आडगळे व नगरसेवक यांनी महादेव मंदिरा जवळ उभा केलेल्या स्टेजवर स्वागत करून मंडळाचे अध्यक्ष यांचे सत्कार करून श्री गणेशा पुष्पहार घालण्यात आला यावेळी प्रत्येक मंडळासाठी खाऊ साठी केळी चा प्रसाद देण्यात आला मिरवणुकीत छत्रपती गणेशोत्सव मंडळ गोळीबार चौक,नागराज गणेशोत्सव मंडळ नागोबा कट्टा, शिवरत्न गणेशोत्सव मंडळ विजय चौक,वंदेमातरम गणेशोत्सव मंडळ गणेशनगर,वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ जुने पोलीस ठाणे,नवक्रांती गणेशोत्सव मंडळ दत्तचौक, सिध्दीविनायक गणेशोत्सव मंडळ शिवापुर पेठ भाजीमंडई, संग्राम नगर चा राजा गजराज गणेशोत्सव मंडळ संग्रामनगर ,श्री लंबोदर गणेशोत्सव मंडळ माळेवाडी सहभागी झाले होते.सर्व मंडळांनी डाॅल्बीडीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत गाजत फुलांची मुक्त उधळण करीत श्री ची विसर्जन मिरवणुक शिवपुरी पेठ,मारुती मंदीर मार्गे शासकीय परवानगी वेळेत निरानदीमधे श्री चे विसर्जन केले.अकलुज पोलीस ठाण्याचे निरीक्षक निरज उबाळे व त्यांच्या सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवत निर्विघ्नपणे विसर्जन मिरवणुक पार पाडली. गणपती मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती
Post Views: 5