सोलापूर : पद्मशाली समाजातील पहिले न्यायाधीश म्हणून विष्णू दासरी यांचे नुकतेच सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या माजी नगरसेवक विठ्ठल कोटा यांच्या हस्ते शाल, बुके देउन आणि पेढे भरवून गुरुवारी सकाळी सत्कार करण्यात आला आहे.

न्यायाधीश म्हणून विष्णू दासरी हे सन २००५ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका येथे पहिल्यांदा सेवेत रुजू झाले. एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड झाली होती. महाराष्ट्रातील जवळपास ७ तालुक्यात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. २१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून हा सन्मान कार्यक्रम करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे समन्वयक किशोर व्यंकटगिरी, प्रशांत येमूल, ओमसी पल्ली आदी उपस्थित होते.






















