सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रश्नमंजुषा, चिञकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डाॅ.रविंद्र शेंडगे यांनी माहिती अधिकार वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 6