अक्कलकोट – गुरूवारी मुस्लिम बांधवाचा पवित्र सण बकरी ईद सण होता . नगरपालिकेने गुरुवारी सार्वजनिक ठिकाणी पशुह त्त्या मांसविक्री मनाई बाबत आवाहन केले होते . गुरुवारी बकरी ईद सण असल्याने नगर पालिकेच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देऊन बांधवांनी मोठे सहकार्य केले . याबाबत नगरसेवकतम्मा शेळके यांनी मोठे समाधान व्यक्त करुन आभार व्यक्त केले आहे .
अक्कलकोट नगरपालिकेने स्वामी समर्थाच्या लिला कार्याने वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोट
पावननगरीत गुरुवारी मांसविक्री बंदीबाबत निर्णय घेतला . तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत काटेकोरपणे व्यापारी वर्ग याचे पालन करीत आहे . पण गुरुवारीच यंदा बकरी ईद सण असल्याने नगर पालिकेच्या नियमाचे पालन बाबत शंका व्यक्त होत होती . नगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी मांस विक्री पशुहत्याबाबत मनाई केली होती . यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला गुरुवारी मांसविक्री मनाईचे पालन केले .नगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केले याबाबत प्रभाग क्र एक चे नगरसेवक तम्मा शेळके यांनी नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल नियमाचे पालन केल्याबद्दल आनंद व्यक्त करुन नागरिकांचे आभार मानले आहे .
Post Views: 4