बार्शी – स्वस्वरुप दर्शन श्रीहरी सत्संग परिवार, कापसे मळा, पानगाव, ता. बार्शी आयोजित पुरुषोत्तम (अधिक) मासनिमित्त श्रीरामकथा ज्ञानयज्ञाचे आज रविवार दि. ३१ मे ते शनिवार दि. ६ जूनपर्यंत रोजी सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कथा प्रवक्ते प. पू. राघवचैतन्यबाबा, पुणे यांचे प्रवचने होणार आहेत.
आज रविवार दि. ३१ मे रोजी सकाळी ७ वा. श्री वाल्मिकी रामायण ग्रंथ प्रदक्षिणा होणार असून याच दिवशी ग्रंथ माहात्म्य होणार आहे. तसेच सोमवार दि. १ जून रोजी श्रीराम जन्मोत्सव, मंगळवार दि. २ जून रोजी सीताराम स्वयंवर, बुधवार दि. ३ जून रोजी श्रीराम वनवास आणि केवळ भेट, गुरुवार दि. ४ जून रोजी श्रीराम व भरत भेट, शुक्रवार दि. ५ जून रोजी श्रीराम शबरी मिलन, हनुमान भेट, शनिवार दि. ६ जून रोजी रावण दहन आणि श्रीराम राज्याभिषेक आणि सांगते निमित्त काल्याचे कीर्तन होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आ. राजाभाऊ राऊत, संत माणकोजी महाराज बोधले यांचे १४ वे वंशज हभप डॉ. जयवंत बोधले महाराज, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनीताई कथले, सोलापूर जि. प. चे अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, बार्शी न. प. चे उपनगराध्यक्ष रोहित पाटील, बार्शी पं. समितीच्या सभापती मीनाक्षीताई रोंगे, श्री भगवंत देवस्थानचे सरपंच दिलीप दादा बुडूख व इतर मान्यवर उपस्थित राहणार असून सदरचा कार्यक्रम श्री भगवंत मंदिरात होणार आहे. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बाबासाहेब कापसे यांनी केले आहे.
Post Views: 4