सोलापूर – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्टस् क्लबच्या वतीने समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार क्लबचे संस्थापक सचिव संजय सावंत यांनी जाहीर केले.
समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटक यांना त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या या पुरस्काराचे दुसरे वर्ष असून यंदाच्या वर्षी हे पुरस्कार अनुक्रमे रामजी कश्यप (खो-खो)व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी (डायव्हिंग) या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना तर आंतरराष्ट्रीय डायव्हिंग प्रशिक्षक श्रीकांत शेटे व लॉन टेनिसचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटक राजीव देसाई यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार शनिवारी २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या ५० राष्ट्रीय खेळाडूंचाही सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहीर झालेल्या पुरुष व महिला खेळाडूंना प्रत्येकी 3100 रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल तर संघटक आणि प्रशिक्षक यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी क्रीडा पत्रकार अजितकुमार संगवे, माजी तालुका क्रीडाधिकारी व आंतरराष्ट्रीय खो-खोपटू सत्येन जाधव आणि तालूका क्रीडाधिकारी गणेश पवार यांची निवड समिती नियुक्ती केली होती. या निवडसमितीने ही निवड केली आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्लबचे अध्यक्ष राजू प्याटी, उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू, अंबादास पांढरे, कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे, कार्याध्यक्ष सुरेश भोसले, सल्लागार चंद्रकांत होळकर, रमेश बसाटे, मल्हारी बनसोडे , कृष्णकांत चव्हाण, अविनाश गोडसे, फैजअहमद बेगमपूरे, संजय अंबोले, बाबासाहेब माने , श्रीनिवास कामुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाराम शेंडगे, बी.डी.राठोड,संतोष जाधव,
पुंडलिक कलखांबकर, गणेश कुडले, शाहनवाज मुल्ला , प्रमोद कुरकुळळी,श्रीमंत कोळी ,शिवाजी वसपटे, व्यंकप्पा शेंडगे हे सदस्य प्रयत्नशील आहेत.
Post Views: 10