सांगोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्डूवाडी (ता. माढा) येथे झालेल्या जिल्हा शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या स्पर्धेत १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात साक्षी संतोष केदार, माधुरी अंकुश नरळे आणि साक्षी शंकर रोकडे यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १७ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या गटात सिद्धेश्वरी लालासो काशीद, बरकत अली इरफान मुलाणी आणि सोहम सचिन चव्हाण यांनीही दमदार कामगिरी करत आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची आगामी पुणे विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खजिनदार शंकरराव सावंत, प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासो नरूटे, मार्गदर्शन शिक्षक उपस्थित होते.
यशस्वी खेळाडूंना सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे प्रा.सचिन चव्हाण, प्रशाला क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे, ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डी. के. पाटील, क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव, सुभाष निंबाळकर व प्रा. संतोष लवटे, स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था उपाध्यक्ष ॲड विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके सर्व संस्था सदस्य, पर्यवेक्षक शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 16