सोलापूर : बळीराजा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या कष्टाचा आणि योगदानाचा सन्मान करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, हा संदेश देत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा पूजन, गुणवंतांचा सत्कार आणि दुष्काळग्रस्त शेतकरी व एकल महिलांना सन्मानपूर्वक शिधावाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आयोजित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उत्तर बर्डे तसेच उपस्थित महिलांच्या शुभहस्ते बळीराजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना सादर करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी बळीराजाचे समाजातील स्थान, शेतकऱ्यांचे कष्ट आणि शेतीसमोरील आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले.
यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, डॉ. शिवानी दत्ता मुळे, एमपीएससी परीक्षेत यश संपादन करणारी जान्हवी हनुमंत पवार, तलवारबाजी क्षेत्रातील आनंदी आशुतोष बर्डे आणि महिला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावणारी श्रावणी शहाजी गिरे यांचा गौरव करण्यात आला.
दुष्काळग्रस्त आणि गरजू कुटुंबांना सन्मानपूर्वक शिधावाटप
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकरी बांधव आणि एकल महिलांना करण्यात आलेले शिधावाटप. मदत देताना लाभार्थ्यांच्या स्वाभिमानाला प्राधान्य देत सन्मानपूर्वक जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये देविदास रामचंद्र सुतार (खेड), खंडू मुरलीधर कदम (कारंबा), ताराबाई मराळ (सोलापूर), स्वामिनी पाटील (कोंडी), पार्वती शंकर महाडिक (बक्षी हिप्परगा), कुसुम विठ्ठल माने (बक्षी हिप्परगा), बाळासाहेब शिंदे (सरकोली), मल्लिकार्जुन मेडीदार आणि नंदकुमार पानादी यांचा समावेश होता.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, दत्तामामा मुळे, उज्वलाताई साळुंखे, अभिंजली जाधव, प्रीती कदम, राम माने, अॅड. बाबासाहेब जाधव, अविनाश गोडसे, रमेश अण्णा जाधव, अॅड. गौरव काळे, हनुमंत पवार सर, सचिन चव्हाण, नितीन मोहिते, राहुल जाधव, अजयसिंग सौंदमळे, महेश देवकर, अंबादास सपकाळे, लक्ष्मण महाडिक, दीपक शेळके, ब्रह्मदेव पवार, गोवर्धन गुंड, गजानन साळुंखे, राजू व्यवहारे, दत्ता जाधव, राजेंद्र भोसले, राजेंद्र पवार, प्रकाश जाधव, जय भोसले, नागेश वडणे, प्रसाद खोबरे, बिराजदार, दीपक यादव, अर्चना बरडे, सुमनताई जाधव, स्वाती पवार, वैशाली सातपुते यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि शिव मावळा ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव, गुणवंतांच्या यशाचे कौतुक आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात देत सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.
Views: 11