सोलापूर – आर्थिक वर्ष 2025-26 अखेर सोलापुरातील अग्रगण्य “श्री महावीर अर्बन को-ऑप. बँक लि, सोलापूर” या बँकेच्या ठेवीत रु. 28 कोटीने वाढ झाली आहे.
दिनांक 31.03.2026 अखेर बँकेचे एकूण ठेवी रु. 531, कर्जे रु. 370 कोटी, ढोबळ नफा रु. 9 कोटी, आणि एन.पी.ए. 1.15% इतका आहे.
बँकेने “डिजिटल बँकिंग व्यवहारात अवघ्या एकच वर्षात रु. 500 कोटीचे व्यवहार पूर्ण करून सहकारी बँकिंग क्षेत्रात कांती घडवून उतुंग यश प्राप्त केले आहे
बँकेच्या डिजिटल बँकिंग च्या मोबाईल बँकिंग अॅप द्वारे RTGS, NEFT, IMPS व्यवहार करता येते आणि UPI व्यवहार करता येते.
बँकेस आत्ता पर्यंत उत्तम कामगिरी बद्दल विविध पारितोषक प्राप्त झाले आहेत. ह्यात विविध प्रमुख प्रतिष्ठीत संस्थाकडून “आदर्श बँक” “उत्कृष्ट बैंक” “सर्वोत्तम अध्यक्ष असे अनेक पुरस्कार बँकेस प्राप्त झाले आहेत.
बँकेचे एकूण सहा शाखा असून लवकरच स्वमालकीचे “माधव नगर” शाखा सुरु करण्यात येणार आहे.
बँकेच्या उतुंग यशात बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार, ग्राहक आणि हितचिंतक यांच्या अतूट विश्वासामुळेच “श्री महावीर बँक’ यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे आणि निरंतर विश्वासामुळेच बँक आज एक वटवृक्ष बनली आहे.
चेअरमन दिपक मुनोत यांच्या नेतृत्वाखाली लक्षणीय प्रगती





















