सोलापूर – ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे यांची राज्य कुमार व मुली खो खो संघ निवडीसाठी निवड समितीवर तर असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील चव्हाण यांची सहाय्यक प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र खो- खो असोसिएशनच्या पुणे येथे झालेल्या सभेत सन २०२६-२७ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ही नियुक्ती असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र खो खो असोसिएशचे उपाध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस उमाकांत गायकवाड व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
सुनील चव्हाण हे खो खो चे माजी राष्ट्रीय खेळाडू असून उत्कर्ष क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. ते शहर पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
श्रीरंग बनसोडे हे जिल्हा परिषद शाळा अंत्रोळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते खोखोचे राष्ट्रीय पंच तसेच ते कास्ट्राईब शिक्षक संघटना दक्षिण सोलापूर शाखेचे अध्यक्ष आहेत. त्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी गुरुबाळा सनके, विस्तार अधिकारी आयुब कलबुर्गी, कास्ट्राईब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीशैल कोरे, मुख्याध्यापक युवराज राठोड यांनी अभिनंदन केले.






















