मंगळवेढा – मूळची मंगळवेढयाची व हल्ली पुणे येथील रहिवासी कु. सिद्धी मधुकर वेदपाठक हिची इंग्लंडमधील लॉफबरो विद्यापीठात युजर एक्सपिरिएन्स डिझाईन या विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. उच्च शिक्षणासाठी ती नुकतीच इंग्लंडला रवाना झाली आहे.
सिद्धीने पुण्यातील विश्वकर्मा विद्यापीठातून प्रॉडक्ट डिझाईन विषयातील बी.डी.ई.एस. पदवी पूर्ण केली आहे. शिक्षणासोबतच तिने उद्योगक्षेत्रातही कामाचा अनुभव घेतला आहे. पॅडकेअर लॅबस येथे कार्यरत असताना तिने प्रॉडक्ट डिझाईन,एक्सपिरिएन्स डिझाईनशी संबंधित विविध प्रकल्पांवर काम केले.प्रॉडक्ट डिझाईन मधील पदवी शिक्षण आणि उद्योगक्षेत्रातील अनुभवाच्या पार्श्वभूमीवर तिने पुढील शिक्षणासाठी युएक्स डिझाईन या क्षेत्राची निवड केली आहे.
सिद्धीच्या या शैक्षणिक निवडीबद्दल तीचे वडील प्रो.डॉ.मधुकर वेदपाठक,प्रा.शुभांगी वेदपाठक,समस्त वेदपाठक परिवार,मंगळवेढा यांचेवतीने अभिनंदन करण्यात आले.
Post Views: 6