अक्कलकोट – येथील सी, बी, खेडगी महाविद्यालय सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी अशोक कोरे व व्हाईस चेअरमनपदी डॉ, अशोक माळगे यांची निवड करण्यात आली, नूतन पदाधिकारी यांचा सन्मान ज्येष्ठ प्राध्यापक एस, आर, जीडीमनी व पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले ,याप्रसंगी डॉ, ए, एस, शिंदे, डॉ, ए ,पी ,सुरवसे, डॉ,व्ही.एच. वाघमारे, ,एस ,आर, बुक्कानुरे,विजया कोन्हाळी मॅडम ,गिरी मॅडम, तसेच कामाठी, सचिव, डी ,डी ,होटकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नूतन चेअरमन म्हणाले की, पतसंस्थेचा कारभार पारदर्शक करून पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांना आर्थिक बळ देऊन स्वायत्ततापूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे अभिवाचन दिले, याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते,
Post Views: 10