
सोलापूर : श्री सर्वोदय कच्छी जैन मंडळ, सोलापूर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि देढिया फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दमाणी ब्लड बँक, डफरीन चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या “महा शिबिर” उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी “आयुष्मान वय वंदना कार्ड” या योजनेअंतर्गत 400 कार्ड तयार करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या “मोबिलिटी कार्ड” योजनेअंतर्गत ३२० लाभार्थ्यांना कार्ड देण्यात आले. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी या शिबिराचा मोठा फायदा झाला. तसेच आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला असून १५० आधार कार्ड अपडेट करण्यात आली. शिबिरामध्ये कागदपत्रांची पूर्तता, नोंदणी प्रक्रिया भरून सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. समाजहित लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महाशिबिर यशस्वी करण्यात ममता कुलकर्णी,चंदुभाई देढिया. केतन देढिया अंकित धरमशी, वत्सल देढिया, तेजस देढिया, पलक गडा, नैनेश गडा, दर्ष जागाणी, मोक्षा देढिया, कुंज गडा, माही देढिया, अमिति नागदा. कार्यक्रमास अध्यक्ष धिरेन गडा, उपाध्यक्ष खुशाल देढिया, सचिव मयुर जागाणी, कोषाध्यक्ष कुणाल सावला व राजेश देढिया, बिपीन गडा, पियुष लोडाया, नेरल गडा, केतन निसर, अरुणाबेन शहा, मिथुन दोशी, तेजल जागाणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन गोसर आणि श्रद्धा केनिया यांनी केले




















