बार्शी – येथील शिवशक्ती मैदान येथे लालासाहेब गव्हाणे प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तीन विविध गुणदर्शन, तसेच निरनिराळ्या स्पर्धा झालेल्या कार्यक्रमाची सांगता हभप ज्ञानेश्वर पाटील महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी हृदयरोग तज्ञ् डॉ. लक्ष्मीकांत काबरा, पिपंळगाव दत्त मठाचे दत्त महाराज जाधव, शिवाजी शिक्षण संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, अशोक हेड्डा, संयोजक सेवानिवृत्त सपोनि लालासाहेब गव्हाणे, पीएसआय सुधीर गुळमे, गिरीष थोरात, उद्योजक अरुण डोईफोडे, सरदार गव्हाणे, हभप अशोक पाटील, अक्कलकोट बाळाप्पा मठाचे व्यासपीठ चालक नागनाथ आप्पा स्वामी, प्रा. जी. टी. जाधव, अमोल डिसले, माजी नगरसेवक कुमार डमरे, भाऊसाहेब कोळेकर, माजी शिक्षण मंडळ सदस्य सुरेश जाधव, नगरसेवक गौरव शिंदे, राहुल गव्हाणे आदीसह भाविक उपस्थित होते.
यावेळी एम. डी कार्डीओलॉजीस्ट डॉ. अभिजित काबरा, अय्यगार बेकरीचे मालक सुरेश इरेगौडा, पत्रकार संजय बारबोले, जयकुमार शितोळे, मातृभूमी प्रतिष्ठान आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध स्पर्धेत विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
संयोजक लालासाहेब गव्हाणे यांनी पोलीस खात्यात नोकरी करुनही अध्यात्मिक वारसा जोपासला आहे. हे खरोखरचं कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन हभप दत्त महाराज जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गुळमे,
भाऊसाहेब कोळेकर यांनी तर आभार राहुल गव्हाणे यांनी मानले
चौकट
पोलीस प्रशासना सारख्या अंत्यत संवेदनशील पूर्णवेळ बांधिलकी असलेल्या खात्यात जवळपास ३८ वर्ष सेवा करुन सपोनि पदावरुन सेवानिवृत्त झालेले लालासाहेब गव्हाणे यांनी नोकरी काळातही आपला अध्यात्मिक वसा मोठया कौशल्याने जोपासला आहे. अक्कलकोट येथे सेवेत असताना त्यांना पारमार्थिक संप्रदायातील लोकांशी जवळीकता आली आणि त्यातून पुढे वारकरी संप्रदायातील वाचन, चिंतन, भजन इत्यादी आवडीच्या विषयासाठी मिळालेल्या संधीचे सोनं करत गव्हाणे यांनी स्वतः तर अध्यात्मिक अनुभूती, घेतलीच पण त्याचबरोबर इतर मित्र, सहकारी आणि संपर्कातील लोकांनासुद्धा या सन्मार्गाला आणण्यासाठी प्रयत्न केले. आज बार्शी तालुक्यात पोलीस अधिकारी लालासाहेब गव्हाणे, पीएसआय सुधीर गुळमे, प्रा. अशोक पाटील महागावकर, सरदार गव्हाणे सर यासारखे असंख्य उच्च शिक्षित लोकांचा पारमार्थिक क्षेत्रातील वाढता सहभाग हा खरोखरचं आजच्या युगात अनुकरणीय असा आहे.
Post Views: 6