
सांगोला – करिअर म्हणजे आपण भविष्यात कोण होणार यापेक्षा समाजासाठी कोणते चांगले कार्य करणार आहोत, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. पैसा हेच करिअरचे अंतिम उद्दिष्ट नसून समाजहितासाठी काम करणारी पिढी घडवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी गुण, आवड आणि कौशल्यांच्या आधारे करिअर निवडावे असे मत प्रा.विजय नवले यांनी व्यक्त केले. ते फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, बाबुराव गायकवाड, प्रा.अशोक नवले, बाळासाहेब काटकर, बबनराव जानकर, डाॅ.पियुष साळुंखे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, संस्थाध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक, पालक यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चौकट-
ए आय मुळे नोकऱ्या कमी होणार नसून नव्या प्रकारच्या रोजगार संधी निर्माण होतील. भारतीय अभियंते आज जगभरात विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. संशोधन, नवतंत्रज्ञान आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन दिल्यास देशाचा विकास अधिक वेगाने होईल. भविष्यात जमिनीचे एक्स-रे काढणारे तंत्रज्ञान, अपघात प्रतिबंधक संशोधन आणि अनेक नाविन्यपूर्ण शोध मानवजातीच्या सेवेसाठी उपलब्ध होतील.
-प्रा.विजय नवले
Post Views: 9