पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यात ऊसाला १६ नोव्हेंबर पर्यंत ३५०० रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर करावे अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला आहे.
पंढरपूर मध्ये रविवारी आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. विशेष म्हणजे रविवारी दिवाळीचा पहिला दिवस असूनही शेकडो शेतकरी राजू शेट्टी यांच्या बैठकीसाठी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना पहिली उचल ३ हजार ५००रुपये, कारखाना बंद झाल्यावर १०० रुपये, पुढील हंगाम सुरु होण्या आधी २०० व साखऱेचा दर ४५ रुपयांच्या पुढे गेला तर ७०-३० फॉर्म्युल्यानुसार दर जाहीर करण्याची मागणी शेट्टींनी केली.
सोलापूरच्या कारखानदारांनी ३ हजार १०० ते ३ हजार १५० रुपये असा दर जाहीर केलाय, तो आम्हाला कदापी मान्य नाही. दरम्यान उद्यापासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या ऊस तोडी बंद कराव्यात असं आव्हान राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.
———————-
चौकट : ( शेती अधिकारी ऊसाचा दर ठरविणार का ? शेट्टींचा सवाल )
सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदाराची मीटिंग जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील अनेक कारखानदार मीटिंगसाठी गेले नाहीत. स्वत: जाण्या ऐवेजी कारखानदारींनी कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांना पाठविले. त्यामुळे दर कोण ठरविणार कारखानदार की त्यांचे शेती अधिकारी दर ठरविणार आहेत का ? असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केला.
———————
चौकट : ( पांडुरंगाने परीक्षा घेतली आम्ही पास झालो )
शेतकऱ्यांची आणि माझी पांडुरंगावर नितांत श्रद्धा आहे. पंढरपुरात पांडुरंगाला येऊन अभिषेक घातला. साकडे घातले म्हणून सरकार शक्तिपीठाकडे आज वाकड्या नजरेने बघू शकत नाही. आषाढी वारीत अनवाणी पायाने सात ते आठ किलोमीटर पायी चाललो. त्यामुळे पांडुरंगा ने आपले ऐकले. शक्तीपीठ कदापी होणार नाही. पांडुरंगाने परीक्षा घेतली आणि त्यामध्ये आपण पासही झालो. शक्तीपीठ होणार नाही असा दावा पंढरपुरात शेतकऱ्यांच्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
———————-
चौकट : ( स्वतःला शेतकरी नेता म्हणावणाऱ्यांनी ऊसदर व दूध दराच्याही आंदोलनात यावे )
शक्तिपीठ आणि ए आय डेटा सेंटर याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या सोबत असणारे रोहित पवार यांनी ऊसदर, दूध आंदोलन, विजेचा प्रश्न, जमीन अधिग्रहण प्रश्न अशा अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नात स्वतःला शेतकरी नेता समजणाऱ्याने असले पाहिजे. मला डेटा सेंटर बाबत विचारले तर मी शेतकऱ्यांसोबत आहे हेच सांगणार. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांनी इतरही आंदोलनात सहभागी व्हावे. असे सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी रोहित पवार यांना टोला लगावला आहे.. तसेच याबाबत रोहित पवारांना विचारणाही करा…? असेही यावेळी शेट्टी म्हणाले.
———————-
चौकट : ( मुख्यमंत्र्यांनी गोकूळ मध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती )
गोकुळ मध्ये शासकीय संचालक वाढवण्याच्या निर्णयावर सर्व बाजूंनी टीका होत असताना आज राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांनी हा पोरकटपणा करायची गरज नव्हती अशा शब्दात टोलेबाजी केली आहे. लोकशाहीने महायुतीचा पराभव करुन गोकुळमध्ये सत्ता समविचारीला दिली होती. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा हा निर्णय मान्य करणे गरजेचे असताना त्यांच्या १२ संचालकांना त्यांनी फूस लावून बैठकीस जाऊ दिले नव्हते. आता त्यांनी लोकशाहीचा आदर करुन या १२ संचालकांना बैठकीला पाठवून द्यावे असा टोला दखील त्यांनी लगावला. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन शिवसेना फोडली त्यावेळी त्यांचे आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हा निर्णय मान्य नाही असे न म्हणता न्यायालयात गेले पण लोकशाहीचा निर्णय मान्य नाही अशी विरोधी पक्षांनी भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या संचालकांना बैठकीला पाठवून देऊन लोकशाहीचा आदर करावा असा सल्ला राजू शेट्टी यांनी दिला.
———————-
चौकट : ( ठळक मुद्दे )
सोलापुर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन पेटणार.ऊस दराबाबत सोलापूरच्या कारखानदारांना १६ नोव्हेंबरचा अल्टिमेटम. १६ नोव्हेंबर पर्यंत भाव नाही झाला तर जिल्हाधिकारी कार्यालयावरून मोर्चा.दर घेतल्याशिवाय उठणार नाही असा
राजू शेट्टी यांचा इशारा. येत्या १६ नोव्हेंबर पर्यंत सोलापुर जिल्ह्यातील गाळप बंद राहणार. पोलिसांची विनंती म्हणून दिवाळीत आंदोलन करत नसल्याचे राजु शेट्टीनी सांगितले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















